घरमुंबईराज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर बाळा नांदगावकरांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर बाळा नांदगावकरांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले…

Subscribe

खासदार बृजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत येऊ न देण्याच इशार दिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. एकाने गाय मारली म्हणून वासरू मारायचे नसते, आमचा अयोध्या दौरा ठरलेला आहे. आमची तयारीही सुरू आहे. त्यामुळे आम्ही अयोध्येला जाणारच, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

बैठकीत झाली चर्चा –

- Advertisement -

आज मनसे प्रवक्ते आणि नेत्यांची महत्त्वाची बैठक होती. सर्व प्रवक्ते आणि त्यांना बोलावले होते. तीन सभांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यावर आणि अयोध्या दौऱ्यावर या बैठकीत चर्चा झाली. पुन्हा बैठक होणार आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची भूमिका ठाम असली तरी साहेबांनी दौरा जाहीर केला आहे. त्यावर चर्चा केली. बृजभूषण सिंह हे खासदार आहेत. ते त्यांची भावना व्यक्त करत आहेत. त्यावर राज ठाकरेच बोलतील, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

सर्व तयारी झाली आहे –

- Advertisement -

आमचे जायचे निश्चित झाले आहे. 5 तारीख ठरली आहे. लोकांशी बोलतोय सेक्युरिटीची व्यवस्था आहे. बुकींग वगैरे झाले आहे. बृजभूषण सिंह एकटेच बोलत आहेत. ते बोलतात म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश बोलतंय असं नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारची जनता आमच्या स्वागताला तयार आहे. यावर टीकाटिप्पणी करणे योग्य नाही. त्यातून तेढ निर्माण करणे योग्य नाही, असेही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

बृजभूषण सिंह यांना भाजप समज का देत नाही? प्रश्नावर समज द्यावी, न द्यावी हा भाजपचा विषय आहे. पण आम्ही हिंदुत्व, भोंगे आणि हनुमान चालिसेचा मुद्दा हाती घेतल्यानंतर सर्व जागे झाले आहेत. हनुमान चालिसा म्हणत असून भगवा झेंडा घेऊन जात आहेत. नाना पटोले आयोध्येला, आदित्य ठाकरे अयोध्येला जात आहेत. काही लोक मंदिरात जात आहेत. तर काही लोक हनुमान चालिसा म्हणताना दिसत आहेत, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -