घरमुंबईबाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी महापौर बंगला स्मारकासाठी होतोय हवाली

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी महापौर बंगला स्मारकासाठी होतोय हवाली

Subscribe

*एकहाती सत्तेचा संकल्प *शिवाजीपार्कात महारक्तदान

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेनेने एकहाती सत्तेचा संकल्प सोडला आहे. राज्यातील शिवसैनिक आपल्यापरीने मुंबईत वा असतील त्या ठिकाणाहून बाळासाहेबांना आदरांजली वाहतील, तेव्हा एकहाती सत्तेचा संकल्प ते सोडतील, असे सांगण्यात आले. या निमित्ताने शिवाजीपार्क येथे महारक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवाजी पार्क येथील महापौर बंगला स्मारकासाठी देण्यात येणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मुंबई आणि आसपासचे शिवसैनिक, खासदार, आमदार, नेते आदरांजली वाहण्यासाठी येतील. बाळासाहेबांचा हा सहावा स्मृतीदिन असल्यामुळे शिवसेनेने या निमित्त एक राजकीय संकल्प सोडला आहे. हा संकल्प यशस्वी व्हावा, म्हणजेच राज्यात एकहाती सत्ता घेणे ही बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करण्याची हाक देण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचाही मार्ग मोकळा झाला आहे. याचे श्रेय सरकार घेऊ पाहत असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात असल्यास दुपारी स्मृतीस्थळी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतील, त्यानंतर स्मारक स्थळाची पाहणी करतील, अशी शक्यता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बोलून दाखवली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबियांसह सकाळी साडेदहा वाजता स्मारकस्थळी येतील. इतर पक्षातील नेतेही येऊ शकतात असे शिवसेनेचे नेते सांगत आहेत.

- Advertisement -

यानिमित्त बाळासाहेबांच्या दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १८ तारखेलाही सुरू असेल. यातील रंगसंगीत, छायाचित्रांचे संकलनही प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. हे संकलन विकास वराडकर यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -