घरमुंबईनवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव

Subscribe

नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. तसा प्रस्तावच सिडकोने मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. तसा प्रस्तावच सिडकोने मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा कोणताही प्रस्ताव आधी आला नव्हता. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने मंजूर केला आहे. आम्हाला दि. बा. पाटील यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नव्या मोठ्या प्रकल्पाला दि. बा. पाटील यांचे नाव प्रकल्पग्रस्त कृती समितीने सूचवावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -