Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महसूल मंत्र्यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर कोरोनाचा शिरकाव

महसूल मंत्र्यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर कोरोनाचा शिरकाव

Related Story

- Advertisement -

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून राज्यातील नेत्यांच्याही बंगल्यावर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या देखील बंगल्यावर कोरोनाचा शिरकाव झाला असून, त्यांच्या बंगल्यावरील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे थोरात होम क्वारंटाइन झाले आहेत.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थान रॉयल स्टोन येथील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बाळासाहेब थोरात यांना क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील सात दिवस बाळासाहेब थोरात हे होम क्वारंटाइन राहणार आहेत. दरम्यान थोरात यांच्या कर्मचाऱ्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते तिघेही बरे झाले आहेत. तसेच मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांनादेखील कोरोना झाला होता. यातील अनेक जणांनी कोरोनावर मात केली आहे.

धनंजय मुंडे कार्यरत 

- Advertisement -

विशेष म्हणजे कोरोनातून मुक्त झाल्यावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रालयात उपस्थिती लावली. मंत्रालयातील त्यांच्या दालनात बसून त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचा आढावा घेतला. जून महिन्यात धनंजय मुंडे यांना कोरोनाचे निदान झाले होते. सुमारे पंचवीस दिवस त्यांनी कोरोनावर उपचार घेतले. कोरोनामुक्त झाल्यावर ते चौदा दिवस होम क्वारंटाईन होते. या काळातही त्यांनी घरातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माधमातून मंत्रीमंडळाच्या बैठकीतही उपस्थिती लावली होती. त्यानंतर आता पुन्हा मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात हजेरी लावून खात्याचे कामकाज पाहण्यास सुरवात केली आहे.

- Advertisement -