घरदेश-विदेशसदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच झाला 'तो' गोळीबार; बॅलेस्टिक अहवालातून मोठा खुलासा

सदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच झाला ‘तो’ गोळीबार; बॅलेस्टिक अहवालातून मोठा खुलासा

Subscribe

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभादेवीत शिवसेनेतील उभ्या फूटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा राडा झाला. या राड्यावेळी दादर पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना घडली. हा गोळीबार आमदार सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून झाला असा आरोप झाला, मात्र हे आरोप सरवणकरांनी फेटाळले होते. मात्र बॅलेस्टिक अहवालातून या घटनेबाबत मोठा खुलासा झाला आहे. ‘ती’ गोळी आमदार सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून सुटल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे.

२०२२ मध्ये गणेश विजर्सन मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीत ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबाराची घटना घडली. त्यावेळी हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप झाला. मात्र सरवणकरांनी त्यांच्याविरोधातील हे आरोप फेटाळून लावले. ज्यावरून बरचं राजकारणही रंगल. अशात आता बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या बंदुकीतून हा गोळीबार झाला ती बंदुक सदा सरवणकर यांचीच होती, असं उघड झाल आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूस आणि सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले होते. ज्यानंतर बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालातही ती जप्त केलेली काडतुसे आणि त्यांच्या बंदुकीचे नुमने मिळते जुळते असल्याचे दिसतेय. त्यामुळे सरवणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नेमकी घटना काय? 

गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटाने मंच उभारले होते. ठाकरे गटाच्या शेजारीच शिंदे गटाने आपला मंच उभारला होता. यावेळी या मंचावरून शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. ज्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर समर्थक आपापसात भिडले. यावेळी दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांना शिवीगाळ केली, मात्र हे प्रकरण इथेच थांबल नाही तर या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. या प्रकरणी दादर पोलिसांनी दोन्ही गटातील अनेकांविरोधात गुन्हा दाखल केला. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना बंदुकीचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला.


शेतकरी पुन्हा उतरणार रस्त्यावर! 26 जानेवारीला देशव्यापी आंदोलनावर घेणार निर्णय

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -