घरमुंबईकार्टर रोड - बँडस्टँडचा लवकरच मेकओव्हर ! अभिनेत्री रेखा करणार मदत

कार्टर रोड – बँडस्टँडचा लवकरच मेकओव्हर ! अभिनेत्री रेखा करणार मदत

Subscribe

मुंबईतल्या वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोड आणि बँडस्टँड ही ठिकाणं म्हणजे तरुणांच्या गळ्यातील ताईतच. समुद्र किनाऱ्यावरील मोकळी हवा आणि शांतता अनुभवण्यासाठी लोकं या ठिकाणी आवर्जून येतात. इथलं दुसरं मुख्य आकर्षण म्हणजे, याभागात असणारी सेलिब्रेटींचे आलिशान घरे. सुपरस्टार सलमान खानचं गॅलक्सी अपार्टमेंट तर रोमान्स किंग शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला कार्टर रोडलाच आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या स्टार्सची एक झलक पाहायला मिळावी याकरिता मुंबई बाहेरील पर्यटकही या भागात गर्दी करतात.

अभिनेत्री- खासदार रेखा देणार निधी

- Advertisement -

पर्यटक आणि मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. लवकरच बँडस्टँड आणि कार्टर रोडचा कायापलाट करण्यात येणार आहे. एमएमआर (महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड), आर्किटेक्ट पी.के.दास आणि असोसिट्स आणि काही स्थानिक आर्किटेक्ट्स यांनी एकत्र येत हा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता एकूण १३ करोड रुपयांची तरतूद करण्यात आली असून, अभिनेत्री – खासदार रेखा या देखील त्यांच्या खासदार निधीमधून अडीच कोटी रुपये या कामासाठी देणार आहेत.

१८ वर्षांनी होणार मेकओव्हर 

- Advertisement -

तब्बल १८ वर्षांनी पुन्हा एकदा बँडस्टँड आणि कार्टर रोड भागाचा असा मेकओव्ह करण्यात येणार आहे. पूर्वीच्या काळी बँडस्टँडची ओळख केवळ एक डंपिंग ग्राउंड म्हणून होती. बँडस्टँडचं डंपिंग ग्राउंड मुंबईतलं एक नावाजलेलं डंपिंग ग्राउंड होतं. मात्र अठरा वर्षांपूर्वी या भागाचा कायापालट करत या जागेला एका पर्यटनस्थळाचं स्वरुप देण्यात आलं. यानंतर हळूहळू या जागेला मुंबईकरांची पसंती मिळत गेली आणि बँडस्टँड व कार्टर रोड या जागा खऱ्या अर्थाने नावारुपाला आल्या.

सुशोभिकरणासोबत दुरुस्ती देखील…

बँडस्टँडच्या सुशोभिकरणासोबतच त्याच्या प्राथमिक दुरुस्तीची देखील तरतूद या प्रस्तावात करण्यात आली आहे. मुख्यत्वे करुन यामध्ये सध्या मोडकळीला आलेले बँडस्टँडवरील कट्टे तसेच तिथल्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याशिवाय बँडस्टँडच्या संपूर्ण परिसरात सिमेंट फ्लोअरिंग करण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. एकंदरीतच या यानिमित्ताने बँडस्टँडचं एक नवं कोरं रूप लवकरच मुंबईकरांना अनुभवयाला मिळेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -