घरताज्या घडामोडी'वांद्रे शासकीय वसाहतीचा कायापालट करणार'

‘वांद्रे शासकीय वसाहतीचा कायापालट करणार’

Subscribe

पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी दिली. शासकीय वसाहतीचे रुपडे बदलण्याच्या मोहिमेचा प्रारंभिक भाग म्हणून सद्यस्थितीत या वसाहतीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तातडीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले.

वांद्रे शासकीय वसाहतीच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक झाली. या बेत सार्वजनिक बांधकाम विभागाने एक सादरीकरण करून तेथील परिस्थिती चव्हाण निदर्शनास आणून दिली. त्यानंतर बैठकीला संबोधित करताना चव्हाण यांनी राज्य सरकार वांद्रे वसाहतीतील नागरिकांना दिलासा देण्यासंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले.

- Advertisement -

या वसाहतीत नवीन इमारती उभारण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, तोवर या इमारती सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतचा अहवाल पुढील १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले. दुरुस्ती-देखभालीच्या या कामासाठी लागणारा निधीही तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेबाबत पाच आमदारांच्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे ही बाब मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर ठेवण्यात येईल, असेही अशोक चव्हाण यांनी या बैठकीत सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -