घरमुंबईवांद्रे ते बीकेसी शेअर प्रवासासाठी १५ ते २० रुपयांऐवजी ३० रुपये

वांद्रे ते बीकेसी शेअर प्रवासासाठी १५ ते २० रुपयांऐवजी ३० रुपये

Subscribe

रिक्षाचालकांचा लुटमारीचा धंदा

वांद्रे स्थानक परिसरातून बीकेसी गाठायची असेल तर गैरसोय होतानाच खिशालाही कात्री लागण्याची वेळ प्रवाशांवर सध्या ओढावली आहे. नाला रूंदीकरणाच्या कामामुळे एकतर्फी थांबवण्यात आलेली वाहतूक, बंद असलेला स्कायवॉक आणि आता वांद्रे स्थानकाबाहेरील बस स्टॉपच स्थलांतरीत करण्यात आल्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीत भर पडली आहे. त्यातच रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे आता शेअऱ रिक्षातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. एका शेअर सीटमागे रिक्षाचालक तब्बल ३० रुपये वसूल करत आहेत.

वांद्रे स्थानक ते बीकेसी या अंतरासाठी सध्या बेस्टकडून अवघे ५ रूपये आकारण्यात येतात. तर रिक्षा चालकांकडून शेअर रिक्षासाठी गर्दीच्यावेळेत प्रती सीट २० रुपये तर गर्दी नसलेल्या वेळेत १५ रुपये आकारण्यात येत होते. मात्र आता रिक्षाचालक ३० रूपये आकारत आहेत. इतर पर्याय नसल्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव भरमसाठ पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.

- Advertisement -

स्टेशनच्या पायर्‍यांवरून खाली उतरणार्‍या प्रवाशांची वाट अडवून हे रिक्षाचालक लुटमारीचा धंदा करत आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेल्या स्कायवॉकच्या कामाचा फटकाही मोठ्या प्रमाणात पादचार्‍यांना बसत आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालण्यापेक्षा अनेकदा रिक्षा,बसचा पर्याय वापरण्याकडे प्रवाशांचा कल असतो. वांद्रे स्टेशन, पूर्वेकडील मार्ग एकतर्फी करण्यात आल्यामुळे वांद्रे टर्मिनस स्थानकावरून येणार्‍या बसेस या वांद्रे कोर्ट याठिकाणापासून पुढे बीकेसीत जात आहेत. त्यामुळे वांद्रे स्टेशन ते वांद्रे कोर्ट अशा वाहतूक कोंडीतून पायी मार्ग काढूनच बीकेसी गाठण्याशिवाय प्रवाशांपुढे पर्याय राहिलेला नाही. म्हणूनच प्रवाशांना नाईलाजाने रिक्षाचा वापर करावा लागत आहे.

मीटरवर रिक्षा चालकांची मनमानी
मीटरवर रिक्षा चालवणार्‍या रिक्षा चालकांचाही वांद्रे स्थानकाबाहेर मनमानी कारभार सुरू आहे. भाडे नाकारण्यावरच या रिक्षा चालकांकडून अधिक भरदिसून येत आहे. जवळचे भाडे अनेक कारण देत नाकारतानाच लांबच्या भाड्यासाठी हे रिक्षा चालक तेथे तात्काळताना दिसतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते ते वेगळेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -