घरमुंबईहोम डिलीव्हरी करणाऱ्या वाइन शॉपला १९ लाखांचा दणका

होम डिलीव्हरी करणाऱ्या वाइन शॉपला १९ लाखांचा दणका

Subscribe

वांद्रे येथील होम डिलीव्हरी करणाऱ्या दीपक वाईन्स शॉपला १९ लाखांचा दणका बसला आहे.

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. अनेक गोष्टी या ऑनलाइनच बुक करुन त्या घरपोच किंवा कार्यालयात देखील मागवल्या जातात. मध्यंतरी मद्यपान करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला दारुची होम डिलीव्हरी मिळणार असल्याची घोषणा राज्यमंत्री बावनकुळे यांनी केली होती. महाराष्ट्र सरकारची ही नवी योजना असल्याचे सांगत ‘आता मद्यप्रेमींना घरबसल्या दारू मिळणार’ असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं होतं. मात्र, या निर्णयाबाबत सामाजिक स्तरातून झालेल्या टीकांमुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. परंतु याला अद्याप चाप बसलेला नसल्याचे दिसून येत आहे. घरपोच दारु देणाऱ्या एका वाईन्स शॉपला चांगलाच चाप बसला आहे. वांद्रेमधील एका वाईन शॉपने योग्य परवाना नसताना देखील घरपोच दारु पोहोचवल्यामुळे या शॉपला १९ लाखांचा चांगलाच दंड बसला आहे.

नेमके काय घडले?

वांद्रे येथील पाली हिल या ठिकाणी असणाऱ्या दीपक वाईन्स या घाऊक दारु विक्रेत्याला योग्य परवाना नसताना देखील घरपोच दारु पोचवल्याच्या तक्रारीवरुन रविवारी रात्री धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १८ लाख ९० हजाराचा दंड ठोठवण्यात आला आहे. २०१७ ते २०१८ या कालवधीत नोंदणी न ठेवता विक्री केलेल्या दारुची किंमत सुमारे ११ लाख रुपये असल्याचं उघड झालं आहे. विक्रेत्याचा ताळबंद तपासात ६ लाख ३० हजाराची दारु कोणत्याही नोंदीशिवाय त्याची विक्री केली जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या विक्रेत्याला १९ लाखांचा दंड ठोठावला असल्याची माहिती तपास अधिकारी सुभाष जाधव यांनी दिली आहे.

- Advertisement -

या कारणांमुळे करण्यात आली कारवाई

पाली हिल या ठिकाणी असणाऱ्या दीपक वाईन्स या शॉपमध्ये नोंदणी नसलेल्या दारुची विक्री केली जायची. त्याचप्रमाणे ताळेबंद न ठेवणे असे आरोप संबंधित दारु आरोप संबंधित दारु विक्रेत्यावर ठेवण्यात आले आहेत. या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.


वाचा – अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा धडाका

- Advertisement -

वाचा – नरभक्षक टी-१ वाघिणीची अखेर शिकार; राळेगाव जंगलात कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -