सी-लिंकवर थरार! पक्षाला वाचवण्यासाठी गाडीतून उतरले, टॅक्सीच्या धडकेत व्यवसायिकाचा जागीच मृत्यू

अमर मनीष  जरीवाला असं मृत व्यक्तीचं नाव असून जरीवाला यांचा चालक श्याम सुंदर असं जखमीचं नाव आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्ह कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारमधून खाली उतरलेल्या दोघांना टॅक्सीने चिरडल्याची घटा मुंबईथील वांद्रे-वरळी सी लिंकवर घडली आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. अमर मनीष  जरीवाला असं मृत व्यक्तीचं नाव असून जरीवाला यांचा चालक श्याम सुंदर असं जखमीचं नाव आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्ह कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Bandra Worli Sea Link Accident taxi thrashed two people)

हेही वाचा – वडाच्या झाडाची फांदी तोडल्यास ५ हजारांपर्यंत दंड, मुंबई महापालिकेचा नागरिकांना इशारा

महामार्गावर, ब्रिजवर गाड्या न थांबवण्याचं आवाहन करण्यात येतं. मात्र, अशा सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेकदा गाड्या थांबवल्या जातात. प्राणी-पक्ष्यांना वाचवण्याच्या नादात अनेकदा माणसांचा नाहक बळी जातो. असाच प्रकार मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर घडला आहे.

हेही वाचा वाहतूक पोलिसांकडून सहप्रवाशांना हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी, मुंबईत बाईकस्वारांविरुद्ध कारवाई

अमर जरीवाला हे व्यवसायिक असून आपल्या कारने मालाडला जात होते. त्यावेळी एक पक्षी जखमी अवस्थेत त्यांना दिसला. या पक्षाला वाचवण्यासाठी जरीवाला हे आपल्या चालकासह कारमधून खाली उतरले. त्यावेळी काही वाहनं वेग कमी करून बाजुने निघूत जात होते. मात्र, एक टॅक्सी भरधाव वेगात येऊन जरीवाला आणि त्यांच्या चालकाला जोरात धडक देऊन गेला. या धडकेत दोघेही हवेत उडून दुसरीकडे पडले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात. मात्र, उपचारांदरम्यान जरीवाला यांचा मृत्यू झाला तर चालकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात ३० मे रोजी झाला असून या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत.