Homeक्राइमBangladeshi National : मॉरिशसहून आलेल्या बांगलादेशी नागरिकाला अटक; बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवला...

Bangladeshi National : मॉरिशसहून आलेल्या बांगलादेशी नागरिकाला अटक; बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवला पासपोर्ट

Subscribe

मॉरिशसहून आलेल्या शरीफ मोहम्मद मोफिजुर रेहमान या बांगलादेशी नागरिकाला रविवारी सहार पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी बोगस भारतीय पासपोर्टसह इतर दस्तावेज जप्त केले आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई : सध्या देशभरात बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. जागोजागी बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू आहे. अशातच आता मॉरिशसहून आलेल्या शरीफ मोहम्मद मोफिजुर रेहमान या बांगलादेशी नागरिकाला रविवारी सहार पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी बोगस भारतीय पासपोर्टसह इतर दस्तावेज जप्त केले आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. (bangladeshi national from mauritius arrested; passport obtained on the basis of forged documents)

शरीफ रेहमान हा शनिवारी रात्री मॉरिशसहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. त्याच्या इमिग्रेशनची तपासणी करताना या अधिकार्‍यांना त्याच्या पासपोर्टवर बांगलादेशचा व्हिसा दिसला. याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. बांगलादेशातील उपासमारी आणि बेरोजगारीला कंटाळून आपण सात वर्षांपूर्वी भारतात पळून आल्याचे त्याने सांगितले. तेव्हापासून तो गुजरातमधील सुरत शहरात वास्तव्यास होता. याच दरम्यान त्याने भारतीय नागरिक असल्याचे काही दस्तावेज एका एजंटच्या मदतीने बनविले होते.

हेही वाचा – Justin Trudeau resigned : अखेर जस्टिन ट्रूडो यांचा राजीनामा; पक्षाचे अध्यक्षपद देखील सोडले

या कागदपत्रात आधारकार्ड, पॅनकार्डसह इतरही कागदपत्रे आहेत. याच कागदपत्रांच्या साहाय्याने त्याने सुरत पासपोर्ट कार्यालयातून एक बोगस भारतीय पासपोर्ट मिळवला. याच पासपोर्टवर तो दोन वेळा बांगलादेशात तर 10 नोव्हेंबर 2024 रोजी मॉरिशसला गेला होता. शनिवारी रात्री उशिरा तो मॉरिशसहून मुंबईत आला. यावेळी त्याला ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करत पासपोर्ट मिळवून विदेशात प्रवास केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा – Boundary Dispute : मृतदेह देखील जेव्हा हद्दीच्या वादात सापडतो…वाचा काय आहे प्रकरण


Edited by : Ashwini A. Bhatavdekar