घरदेश-विदेशएप्रिलमध्ये बँका 10 दिवस बंद

एप्रिलमध्ये बँका 10 दिवस बंद

Subscribe

आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार

1 एप्रिल 2019 पासून नवे आर्थिक वर्षे सुरू झाले असून प्रत्येक एप्रिलमध्ये बँकांना मोठी सुट्टी असते. परंतु, यावेळेस बँकांना सलग मोठी सुट्टी नसून वेगेवेगळ्या दिवशी सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे तुम्ही आतापासूनच बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहून त्यानुसार आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या दिवशी बँकांची सुट्टी असणार आहे.

एप्रिलमध्ये नेहमीप्रमाणेच बैसाखी, राम नवमी, गुड फ्रायडे आणि महावीर जयंतीची बँकाना सुट्टी असणार आहे. दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. महिन्याच्या पहिल्या शनिवारी म्हणजेच 6 एप्रिलला गुढीपाडवा असल्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि गुजरातमध्ये बँका बंद असतील. दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी नेहमीप्रमाणे बँका बंद राहतील. दुसरा शनिवार 13 एप्रिल आणि चौथा शनिवार 27 एप्रिलला येत आहे. म्हणजेच एप्रिलमध्ये 20 एप्रिलला शनिवारी बँका सुरू राहतील.

- Advertisement -

एप्रिल 13 आणि 14 एप्रिलला दुसर्‍या शनिवारी आणि रविवार असल्याने बँक बंद राहतील. या दोन्ही दिवशी आंबेडकर जयंती आणि बैसाखी देखील आहेे. या दोन्ही सुट्ट्या शनिवार आणि रविवारी असल्याने बँकांची सुट्टी कमी होईल. 17 एप्रिल (बुधवारी) महावीर जयंती असल्याने अधिकतर राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. याच्या एक दिवसानंतर 19 एप्रिलला गुड फ्रायडे आहे. यामुळे 19 एप्रिललाही बँक बंद राहतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -