घरताज्या घडामोडीTRP : BARC ने वृत्त वाहिन्यांचे रेटिंग जाहीर, नवे निकष काय ?

TRP : BARC ने वृत्त वाहिन्यांचे रेटिंग जाहीर, नवे निकष काय ?

Subscribe

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंन्सिल (BARC) इंडियाने प्रत्येक न्यूज चॅनलनुसार रेटिंगची पद्दती पुन्हा सुरू केली आहे. वर्ष २०२२ च्या दहाव्या आठवड्याची आकडेवारी बीएआरसीच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. इंडस्ट्रीच्या मागणीमुळेच वृत्तवाहिन्यांसाठी हे रेटिंग करण्यात आले आहे. बीएआरसीच्या टीमने बीएआरसी टेककॉमच्या मदतीने ऑगमेंटेड डेटा रिपोर्टिंग स्टॅण्डर्ड्स तयार केले होते. नव्या निकषानुसार प्रत्येक आठवड्याला तुलनात्मक असे सरासरी रेटिंग जाहीर करण्याचा निर्णय बीएआरसीने घेतला आहे.

बीएआरसीने केलेल्या खुलाशानुसार एक स्पर्धात्मक वातावरण निर्मितीसाठीच हा प्रयत्न असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच प्रत्येक आठवड्याला नवीन आकडेवारी तयार होणार नाही, असेही बीएआरसीने म्हटले आहे. प्रेक्षकांच्या आकडेवारीसाठी विशिष्ट आणि स्वतंत्र लॉग इनची पद्धतही असणार आहे. निर्णय प्रक्रियेत महत्वाचा असा डेटा असल्याने याबाबतची मागणी ही अनेक वृत्तवाहिन्यांकडून होत होती. त्यामुळेच अनेक वृत्तवाहिन्यांकडून या आकडेवारीची मागणी झाली होती. जानेवारी २०२१ तसेच फेब्रुवारी २०२२ साठीची आकडेवारी काही वाहिन्यांकडून मागण्यात आली होती. त्यामुळेच हा डेटा मागणी केलेल्या वृत्तवाहिन्यांना देण्यात येईल, असेही बीएआरसीने स्पष्ट केले आहे. या आकडेवारीमुळे फक्त डेटा समोर येत नाही, तर संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि प्रभावी करण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचे बीएआरसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -