HomeमुंबईBathing Tips : तुरटीच्या पाण्याने अंघोळ करण्याचे हे आहेत फायदे

Bathing Tips : तुरटीच्या पाण्याने अंघोळ करण्याचे हे आहेत फायदे

Subscribe

तुरटीचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, याचा उपयोग आरोग्य आणि सौंदर्यासाठीही केला जातो.तुरटीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. तर जाणून घेऊया तुरटीचे फायदे

  • तुरटी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण तुरटीमध्ये तुरट गुणधर्म आढळतात. या तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. एवढेच नाही तर तुरटीचे पाणी तुम्हाला पिगमेंटेशन आणि त्वचेवर पुरळ आणि मुरुम इत्यादीपासून आराम देईल.
  • तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे केसांसाठी सर्वात फायदेशीर असतात. तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यास ते केस आणि टाळूपर्यंत खोलवर पोहोचते आणि घाण दूर होते.
  • तुरटीच्या पाण्यात आंघोळ केल्याने घामाच्या वासापासून सुटका मिळते. तुरटीमध्ये तुरट आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, जे शरीरातून येणारा घामाचा वास रोखतात.
  • ज्या लोकांना अनेकदा युरिन इन्फेक्शनच्या तक्रारी असतात,त्यांनी विशेषतः तुरटी वापरावी. तुमचे खाजगी भाग स्वच्छ करण्यासाठी तुरटी हा उत्तम पर्याय मानला जातो. यामुळे युरिन इन्फेक्शन किंवा इतर प्रकारच्या संसर्गाची शक्यता कमी होते.
  • तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणे एक प्रकारे वेदना निवारण थेरपीसारखेच मानले जाते. जसे गरम पाणी तुमच्या सांधे आणि मज्जातंतूंसाठी चांगले असते,त्याचप्रमाणे गरम पाण्यात तुरटी टाकल्याने तुमचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
  • तुरटीच्या पाण्याने गोळण्या केल्यास श्वासाची दुर्गंधी दूर होते. तुरटीच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात जे आपले तोंड स्वच्छ करण्यास मदत करतात आणि दातदुखी, दातांमध्ये रक्तस्त्राव इत्यादीपासून आराम देतात.
  • फंगल इन्फेक्शन कमी होते जर आपल्या पायांना दुर्गंधी येत असेल किंवा एखाद्या प्रकारचे बुरशीजन्य संसर्ग वाढत असेल तर तुरटीचा वापर करा. गरम पाण्यात तुरटी घाला आणि दररोज आपले पाय धुवा.

Edited By : Nikita Shinde