ठाण्यात छोटा राजनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ठाणे शहरात अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

bday wishes banner for underworld don chota rajan in thane
ठाण्यात छोटा राजनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ठाणे शहरात अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या शुभेच्छा देणारे फलक बस स्थानकावर झळकल्याने संपूर्ण ठाणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हे फोटो कोणी लावले आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोरील बस स्थानकावर हा बॅनर झळकला आहे. त्यामुळे हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

यांनी दिल्या छोटा राजनला शुभेच्छा?

छोटा राजनला शुभेच्छा देणारा हा बॅनर ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे एका स्थानकावर लावण्यात आला आहे. तसेच हा बॅनर ‘सी. आर. सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य’ यांच्याकडून रविवारी मध्यरात्री लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. १३ जानेवारीला छोटा राजनचा वाढदिवस असल्याने त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनवर शुभेच्छुक म्हणून, प्रकाश भालचंद्र शेलटकर, अध्यक्ष ठाणे शहर तसेच संगीता ताई शिंदे, ठाणे शहर महिला अध्यक्ष आणि राजाभाऊ गोळे, मुंबई शहर अध्यक्ष त्याचबरोबर हेमचंद्र उर्फ दादा मोरे संस्थापक-अध्यक्ष अशा व्यक्तींची नावे देखील आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – जालना : प्रसिद्ध उद्योगपती राजेश नहार यांच्यावर गोळीबार