घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण; सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण; सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी

Subscribe

मुंबईतील सायन चुनाभट्टी परिसरातील सोमय्या मैदानात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना काही समाजकंटकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

मुंबईतील सायन चुनाभट्टी परिसरातील सोमय्या मैदानात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना काही समाजकंटकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी याची तातडीने दखल घेऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी केली. (Beating journalists at Chief Minister event Demand for investigation of MP Supriya Sule)

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर या घटनेबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमातील रिकाम्या खूर्च्या दाखवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार, पत्रकारांनी रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ काढल्याने त्यांना मारहाण केल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

सुप्रिया सुळेंच्या ट्वीटमध्ये काय?

“मुंबईतील सायन चुनाभट्टी परिसरातील सोमय्या मैदानात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना काही समाजकंटकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. राज्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना मारहाण केली जाते ही अतिशय गंभीर बाब आहे”, असे सुप्रिया सुळे म्हटले.

- Advertisement -

याशिवाय, “पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहमंत्री महोदयांनी याची तातडीने दखल घेऊन याबाबत कारवाई करण्याची गरज आहे. राजकीय व्यक्तींनी देखील अशा घटना घडू नयेत यासाठी त्यांनी देखील कार्यकर्त्यांना आवर घालणे आवश्यक आहे”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.


हेही वाचा – ‘EVM हा घोटाळाच आहे…’ कर्नाटकातील भाजपाच्या पराभवावर आव्हाडांची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -