घरमुंबईमुंबईतील कोळीवाड्यांचे सुशोभीकरण करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबईतील कोळीवाड्यांचे सुशोभीकरण करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Subscribe

मुंबई – मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच शहरातील कोळीवाडे पर्यटनदृष्ट्या आकर्षणाचे केंद्रबिंदू व्हावेत यासाठी त्यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात आणि त्यांचे सुशोभीकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.

एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात मुंबई सौंदर्यीकरणाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – घर ते तुरुंगापर्यंत राऊतांसोबत सावलीसारखे वावरणारे ते ‘संजय’ कोण?

पर्यटनदृष्ट्या मुंबईचे महत्व वाढविण्यासाठी या महानगरीचा कायापालट होणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांचे, हेरिटेज इमारतींचे, वाहतुकीची बेटं, चौक यांचे सुशोभीकरण मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येत असून त्याला गती द्यावी, अशी सूचना शिंदे यांनी केली.

- Advertisement -

मुंबईतील कोळीवाड्यांना पायाभूत सुविधा पुरवाव्यात तसेच त्यांचे सौंदर्यीकरण करून कोळीवाडे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू होतील यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होण्यास मदत होईल. तेथील संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची ओळखही देशविदेशातील पर्यटकांना होईल यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबईतील पोलीस वसाहती, शासकीय रुग्णालये, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना निधी देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मुंबईतील चौक, रस्ते, पदपथ, रस्ते यांचे सुशोभीकरण करतानाच गेट वे ऑफ इंडिया, हॅंगिग गार्डन, शहीद भगतसिंह रोड, फोर्ट, रिगल सिनेमा सर्कल आदी ठिकाणी थ्री डी होर्डींग्ज, डिजिटल फलक लावण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -