बीड – राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. पहिल्या फेरीपासून महाराष्ट्रातील मतदारांचा कल महायुतीच्याबाजूने असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातही हाच कल दिसत आहे. लोकसभेत बीडमध्ये महायुतीच्या – भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता, मात्र विधानसभेत बीड जिल्ह्यात वेगळाच निकाल येताना दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या परळी मतदारसंघांतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे विजयी झाले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडेंचा शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी 6500 मतांनी पराभव केला होता. परळी मतदारसंघात मात्र त्यांना 70 हजारांहून अधिक मताधिक्य होते. त्यामुळे परळीमध्ये धनंजय मुंडे यांना आव्हान तसे नव्हते. गेल्यावेळी (2019) त्यांची लढत बहीण पंकजासोबतच होती. यावेळी बहीण-भाऊ दोघेही एकत्र आले आहेत. लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेआधी पंकजा यांची विधान परिषदेत निवड करुन राजकीय पुनर्वसन करण्यात आले.
जरांगे फॅक्टर फेल
मनोज जरांगे फॅक्टरमुळे लोकभेत बीडमध्ये फटका बसला असला तरी यावेळी बीडमधील सहा पैकी चार मतदारसंघात महायुतीला विजय मिळताना दिसत आहे. बीड विधानसभेत पुन्हा एकदा शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांना जनतेने पसंती दर्शवली आहे. तर माजलगावमध्ये शरद पवार गटाच मोहन जगताप विजयी झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत काय झाले ?
गेवराई – गेवराईमध्ये अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित विजयी झाले. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे बदामराव पंडित यांचा पराभव केला.
माजलगाव – माजलगावमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली. यात अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके
यांनी बाजी मारत शरद पवारांचे उमेदवार मोहन जगताप यांचा पराभव केला.
बीड – बीड विधानसभेत पुन्हा एकदा शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांना जनतेने पसंती दर्शवली आहे. त्यांनी चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांचा पराभव केला.
आष्टी – आष्टीमध्ये भाजपचे सुरेश धस 77 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. शरद पवार गटाचे मेहबूब शेख तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. अपक्ष भीमराव धोंडे क्रमांक दोनवर राहिले.
केज – केजमध्ये भाजपच्या नमिता मुंदडा यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठेंचा पराभव केला. अवघी 2687 मतांची आघाडी मुंदडा यांना मिळाली.
परळी – परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांचा 1 लाख 40 हजार 224 एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांना 54 हजार 665 मते मिळाली.
हेही वाचा : Balasaheb Thorat : काँग्रेसचा ‘CM’पदाचा चेहरा पडला, थोरातांचा पराभव करत शिंदेंचा उमेदवार ठरला ‘जायंट किलर’
Edited by – Unmesh Khandale