घरमुंबई#BoycottMadeInChia: चीनी डेव्हलपर्सचे अॅप रिमुव्ह करण्याची सुरूवात

#BoycottMadeInChia: चीनी डेव्हलपर्सचे अॅप रिमुव्ह करण्याची सुरूवात

Subscribe

जाणून घ्या, चीनी अॅप रिमुव्ह करण्याची प्रक्रिया...

आपल्या मोबाईलमध्ये चीनमध्ये डेव्हलप झालेले किती मोबाईल अॅप्लिकेशन आहेत, हे शोधणारे अॅप्लिकेशन काही भारतीय अभियंत्यांनी तयार केले आहे. याचा उपयोग हा तत्काळ चीनमध्ये डेव्हलप केलेले अॅप्लिकेशन शोधण्यासाठी होतो. अवघ्या काही तासांमध्येच या अॅप्लिकेशनला मोठ्या प्रमाणात पसंती मिळू लागली आहे. हे अॅप वापरणाऱ्यांचे प्रमाण हे प्रत्येक तीन मिनिटाला २० हजार इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. ट्विटरवर #BoycottMadeInChia या ट्रेंडनंतर चीनी अॅप्सना मोठ्या प्रमाणात नापसंत केले जात आहे. रिमुव्ह चायना अॅप हे अॅप्लिकेशन जयपूरमधील काही अभियंत्यांनी मिळून तयार केले आहे.

सरकारी काम करणाऱ्यांना टिकटॉक वापरण्यास मज्जाव

- Advertisement -

जवळपास ५८ हजारांहून अधिक ट्विट्स हे या हॅशटॅगचा वापर करून करण्यात आले आहेत. अनेक ट्विटर युजर्सने आपल्या फोनमधून चायनीज अॅप डिलिट करत आपल्य़ा फोनचा स्क्रिनशॉट शेअऱ केले आहे. त्यासोबतच या हॅशटॅगचा वापरही करण्यात आला आहे. चीनमध्ये तयार होणाऱ्या अॅपचे धोरणच या वाढत्या विरोधासाठी कारणीभूत आहे.

चीनविरोधी तसेच टीका करणाऱ्या व्हिडिओला टिकटॉक सारख्या अॅपवर रिच मिळत नाही. चीन सरकार २४ तास ही माहितीचा शोध घेत असते. अमेरिकेतही सरकारी काम करणाऱ्यांना टिकटॉक वापरण्यासाठी मज्जाव आहे. चीनी डेव्हलपर्सच्या अॅपमध्ये अटी आणि शर्थी स्पष्ट नसल्यानेही या अॅपला विरोध वाढत आहे.

चीनी अॅप कसे रिमुव्ह कराल ?

  • रिमुव्ह चायना अॅप डाऊनलोड करा.
  • अॅप डाऊनलोड झाल्यानंतर उघडा.
  • स्कॅन चायना अॅप हा पर्याय वापरा.
  • त्यामुळे निवडक अॅप्लिकेशन रिमुव्ह करण्यासाठी बिन अॅपचा वापर करा.
  •  तुमच्या मोबाईलमधील चीन डेव्हलपर अॅप रिमुव्ह करणे शक्य होईल.

‘सोनम वांगचुक’ यांनी सांगितला चीनला हरवण्याचा राजमार्ग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -