घरमुंबईBEST Bus : मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी BEST उपक्रम, नक्की काय आहे...

BEST Bus : मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी BEST उपक्रम, नक्की काय आहे वाचा…

Subscribe

ज्येष्ठ नागरिकांचा विरंगुळा व्हावा, यासाठी न्युयॉर्क शहरात वृद्धांसाठी विशेष असा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील विरंगुळाच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना बसची सेवा उपलब्ध करून दिली जाते. असाच उपक्रम मुंबईत देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्याची इच्छा बेस्टकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचा विरंगुळा व्हावा, यासाठी न्युयॉर्क शहरात वृद्धांसाठी विशेष असा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील विरंगुळाच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना बसची सेवा उपलब्ध करून दिली जाते. असाच उपक्रम मुंबईत देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्याची इच्छा बेस्टकडून व्यक्त करण्यात आली आहे. वातानुकूलित बससेवा मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना देण्यासाठी राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या बेस्टकडे बसचा तुटवडा असून नव्या बस खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा देखील नसल्याने खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्त्वावर बस घेतल्या जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम कसा राबवता येऊ शकतो? याचा विचार बेस्टकडून केला जात आहे. (BEST activities for senior citizen recreation in Mumbai)

हेही वाचा – Mumbai Double Decker : 25 वर्षे सेवा देणाऱ्या ‘ओपन डबल डेकर’ बसचा उद्या शेवटचा प्रवास

- Advertisement -

न्यूयॉर्कमध्ये ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याच्या ठिकाणी बसने नेऊन आयुष्यात आनंदाचा क्षण देण्याचा उपक्रम राबविला जातो. अगदी कमी शुल्कात दिवसभर ही सेवा उपलब्ध तेथील ज्येष्ठांना दिली जाते. त्यामुळेमुंबईत सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना अशी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बेस्टकडून ज्येष्ठांसाठी भाडेतत्त्वावर बस देण्याचा विचार सुरू असतानाच जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून बेस्ट बस खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 10 बस ज्येष्ठ नागरिकांच्या उपक्रमासाठी खरेदी केल्या जाणार आहेत. या बस वातानुकूलित (AC) असतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. परंतु, बस खरेदी करण्याआधी मुंबईतील विरंगुळ्याची नेमकी ठिकाणे कोणती?, बसच्या वेळा कशा नियोजित करण्यात याव्यात?, तिकीट आकारणी करण्यात यावी की मोफत प्रवास देण्यात यावा, इत्यादीवर विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी बेस्टकडे स्वमालकीच्या बस घेण्याचा विचार नाही. परंतु, भाडे तत्त्वावर बस घेण्यात येऊ शकतात.

- Advertisement -

सध्या बेस्टकडून स्वमालकीपेक्षा भाडेतत्त्वावर बस खरेदी करण्याकडे अधिक कल दिला आहे. तसेच एक बस ही साधारण दीड कोटी रुपयांपर्यंत येते. त्यामुळे दहा बस खरेदी करण्यासाठी लागणारा निधी पाहता भाडेतत्त्वावरच बस घेण्याचा पर्याय उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून या बस खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यासंदर्भात जुलै 2023मध्ये मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही घोषणा केली होती. मात्र बेस्टकडे बसगाड्या कमतरतेमुळे या उपक्रमाला गती मिळत नव्हती. अद्यापही हा उपक्रम सुरू अडथळेच निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -