घरमुंबईबेस्टकडून पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरातील बसपास योजना घोषित

बेस्टकडून पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरातील बसपास योजना घोषित

Subscribe

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आलेल्या सुचनेची बेस्ट उपक्रमाने २४ तासात दखल घेतली आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असणा-या विद्यार्थ्यांकरिता बेस्ट उपक्रमातर्फे सवलतीच्या दरातील बसपास योजना शुक्रवारी घोषित करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदर विद्यार्थ्यांसाठी ही बसपास योजना येत्या २२ ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील खडतर प्रवासाचे विघ्न दूर झाले असून गणपती बाप्पा विद्यार्थ्यांना चांगलाच पावला, असे म्हणायला काही हरकत नसावी.

या योजनेअंतर्गत १२ वी पर्यंतचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना ६४९ रुपये किमतीचा १०० बसफे-यांचा बसपास ३५० रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. तसेच, १,०५० रुपयांचा तिमाही बसपास आणि अर्धवार्षिक मुदतीचा १,७५० रुपयांचा बसपास देखील उपलब्ध करण्यात आला आहे.

- Advertisement -

पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १०० –

फेऱ्यांचा ९९९ रुपयांचा मासिक बसपास ५०० रुपये एवढ्या सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. तर, तिमाही बसपास १,५०० रुपये आणि अर्धवार्षिक बसपास २,५०० रुपये इतक्या किमतीला उपलब्ध होणार आहेत.त्याचप्रमाणे १० वी पर्यंतचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना बेस्ट उपक्रमाद्वारे सवलतीचे बसपास उपलब्ध आहेत. इयत्ता पाचवीपर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी मासिक बसपास २०० रुपये, तिमाही ६०० रुपये आणि अर्धवार्षिक १,००० रुपये तसेच सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मासिक २०० रुपये, तिमाही ७५० रुपये आणि अर्धवार्षिक १,२५० रुपये इतक्या किंमतीला उपलब्ध आहे.

- Advertisement -

सदर सवलतीच्या दरातील बसपास २२ ऑगस्टपासून देण्यात येणार आहेत. विद्यार्थी ‘बेस्ट चलो अँप’ च्या माध्यमातून ऑन लाईन अर्ज करु शकतात किंवा जवळच्या बेस्ट आगारातून स्मार्ट कार्ड घेऊ शकतात. सदर योजनेमुळे विद्यार्थ्यांना लाभ होणार असून सदर योजना सार्वजनिक परिवहन बससेवा वापरण्याकरिता प्रोत्साहन देणारी आहे, असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -