मुंबईतील चकाला येथे बेस्ट बसला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतल्या अंधेरी येथील चकाला परिसरात बेस्टच्या बसला आग लागली. दुपारी 3:15 वाजताच्या सुमारास बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी शर्तीच्या प्रयत्यांनी बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.

मुंबईतल्या अंधेरी येथील चकाला परिसरात बेस्टच्या बसला आग लागली. दुपारी 3:15 वाजताच्या सुमारास बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी शर्तीच्या प्रयत्यांनी बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. विशेष म्हणजे या बसमध्ये प्रवासी होते. मात्र प्रवाशांनी आग लागल्याचे समजताच बसमधून उड्या मारत आपला जीव वाचवला. त्यामुळे सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली. (Best bus caught fire at Chakala in Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी आगरकर चौकातून साकीनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या 415 क्रमांकाच्या बसला सर मथुरादास मार्गावरील चकाला या बेस्ट बस थांब्याजवळ मोठी आग लागली. दुपारी 3:15 वाजताच्या ही आग लागली. या आगीत बेस्टची बस जळून संपूर्णपणे खाक झाली आहे.

विशेष म्हणजे ज्यावेळी या बसला आग लागली. त्यावेळी बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते. या प्रवाशांनी बसमधून उड्या मारत आपला जीव वाचवला. त्यामुळे या बसला लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या बसला लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर आग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर शर्तीचे प्रयत्न करून नियंत्रण मिळवले.

याआधी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एसव्ही रोड येथे बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली होती. आग लागल्यानंतर बसमधील प्रवाशांनी भीतीने आरडाओरडा केला. त्यामुळे बसमधील सर्व प्रवासी प्रसंगावधान राखत उतरल्याने मोठा अनर्थ टळला. बेस्ट बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

रस्त्यातच बसला आग लागल्याने मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. बसमध्ये 20 ते 30 प्रवासी होते अशी माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसात बेस्ट बसला अचानक आली लागण्याच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


हेही वाचा – आता ‘गोकुळ’चं दूध महागलं! 1 लिटरसाठी मोजावे लागणार इतके पैसे