बेस्ट बसची रस्त्यावरील विजेच्या खांबाला धडक

बेस्ट बसची रस्त्यावरील विजेच्या खांबाला धडक

बेस्ट उपक्रमाच्या एका बसने रस्त्यावरील विजेच्या खांबाला धडक दिल्याची घटना दादर ( प.) खेड गल्ली सैतान चौकी येथे रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

Itशनिवारी रात्री मुंबईत अचानक पडलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले होते. त्याच वेळी बेस्टची मार्ग क्रमांक ५६ ही बस वेसावे यारी रोड येथून वरळी येथे जात असताना दादर ( प.), खेड गल्ली शेतान चौकी येथे रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बस चालकाने ब्रेक लावल्यानंतर बस जागेवरच न थांबता निसरड्या रस्त्यावरून स्लीप होऊन नजीकच्या विजेच्या खांब्यावर धडकली. त्यामुळे विजेचा खांब रस्त्याच्या दिशेने झुकला.  यावेळी, बसमध्ये काही प्रवासी होते. मात्र कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी बेस्ट प्रशासन व पोलीस हे अपघाताबाबत चौकशी करीत आहेत.