घरमुंबईBest Bus Fire : नागपाड्याजवळ बेस्टच्या धावत्या बसला आग; जीवितहानी नाही

Best Bus Fire : नागपाड्याजवळ बेस्टच्या धावत्या बसला आग; जीवितहानी नाही

Subscribe

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये आगी लागण्याच्या घटना अधूनमधून घडत आहेत. अशीच काहीशी घटना शनिवारी सकाळच्या सुमारास जे.जे. उड्डाणपूल परिसरात घडली. सांताक्रूझ बस डेपोची एक बस इलेक्ट्रिक हाऊस येथून सांताक्रूझ बस डेपोच्या दिशेने निघाली असताना बसगाडीच्या उजव्या बाजुच्या टायरमध्ये आग लागली. या आगीमुळे बसचालक व वाहक यांनी बसगाडी थांबवली. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर बसला लागलेली आग तातडीने हालचाली करून विझविण्यात आली. या बसमध्ये प्रवासी नव्हते म्हणून पुढील अनर्थ टळला. (Fire in a running bus of BEST near Nagpada No casualties)

हेही वाचा – MLA Disqualification Case : एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपद बेकायदेशीर; उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांचा दावा

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 8.15 वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक हाऊस येथून सांताक्रूझ बस डेपोच्या दिशेने एम.एच. 01 बी.आर. 7403 या क्रमांकाची बसगाडी धावत निघाली. मात्र जे.जे. उड्डाणपूल, नागपाडा येथे बस आली असताना बसच्या उजव्या बाजूच्या मागील टायरमध्ये आगीच्या ठिणग्या उडाल्या व आग लागल्याची घटना घडली.भर रस्त्यात बसगाडीला आग लागल्याने बसचे चालक आणि वाहक हे चांगलेच घाबरले होते. त्यांनी तात्काळ बसगाडी थांबवली. तसेच अग्निशमन दलाला कळविले.

हेही वाचा – OBC Reservation : आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांनी दिली ओबीसी बांधवांना शपथ

- Advertisement -

अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ यंत्रणेचा वापर करून बसच्या चाकांमुळे लागलेली व पसरलेली आग नियंत्रणात आणून विझविली. कोणीही या घटनेत जखमी झाले नाही. मात्र बसचा टायर व बसचा टायरवरील खिडकीजवळचा काही भाग जळाला. त्यामुळे बेस्टचे नुकसान झाले. मात्र ही आगीची घटना का व कशी काय घडली, याबाबत स्थानिक पोलीस, बेस्ट प्रशासन, मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -