घरताज्या घडामोडीपालिकेने ४०६ कोटींच्या कर्जाऐवजी अनुदान द्यावे, बेस्ट समितीचा ठराव

पालिकेने ४०६ कोटींच्या कर्जाऐवजी अनुदान द्यावे, बेस्ट समितीचा ठराव

Subscribe

मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटामधून बाहेर येण्यासाठी ४०६ कोटी रुपयांचे कर्ज न देता ती रक्कम साहाय्य अनुदान म्हणून द्यावी, अशा मागणीचा ठराव आज बेस्ट समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष प्रविण शिंदे यांनी दिली आहे.

बेस्ट उपक्रमातील निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम आणि इतर देणी देण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे मुंबई महापालिका त्यासाठी आवश्यक ४०६ कोटी रुपयांची रक्कम कर्ज म्हणून बेस्टला देणार आहे. या विषयावर आज बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा झाली. बेस्ट उपक्रमावर अगोदरच कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा बोजा असून बेस्ट कोट्यवधी रुपयांनी तोट्यात आहे. बेस्ट उपक्रम मुंबई महापालिकेची एक अंगभूत संस्था असल्याने , पालिकेचाच एक भाग असल्याने पालिका प्रशासनाने बेस्टला सदर ४०६ कोटी रुपये कर्ज म्हणून न देता अनुदान स्वरूपात द्यावेत, असा ठराव आज बेस्ट समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला असल्याचे समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -