घरताज्या घडामोडीबेस्ट कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात; ४० जण कोरोनाबाधित

बेस्ट कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात; ४० जण कोरोनाबाधित

Subscribe

मुंबई शहरात आतापर्यंत ४० बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तसेच या कोरोनाने आपला विळखा मुंबई आणि पुण्यात अधिकच घट्ट केला आहे. या कोरोनावर मात करण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, या कोरोनाने आता त्यांना देखील विळखा घातला आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी यांच्यासह आता बेस्ट कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई शहरात आतापर्यंत ४० बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे.

४० बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबईत सर्वात जास्त कोरोनाबाधित आढळल्याने मुंबईचा रेड झोनमध्ये समावेश झाला आहे. दरम्यान, आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. ४० बेस्ट कर्मचाऱ्यांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांना कोरोनामुक्त करुन घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisement -

बेस्ट कोविड रॅपिड Action टीम

बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनापासून रोखण्यासाठी ‘बेस्ट कोविड रॅपिड action टीम’ तयार करण्यात आली आहे. या रॅपिड action टीममध्ये बेस्टच्या सर्व विभागांच्या प्रमुखांचा समावेश असणार आहे. या टीमद्वारे बेस्ट कर्मचारी आणि त्याचे कुटुंब यांची संपूर्ण माहिती, वैद्यकीय अहवाल या सर्व गोष्टी वेळोवेळी तपासल्या जाणार आहेत.


हेही वाचा – कायदा मंत्रालयातील अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, शास्त्री भवनचा पहिला मजला सील

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -