घरCORONA UPDATEसोमवारपासून बेस्ट कर्मचारी करणार लॉकडाऊन आंदोलन!

सोमवारपासून बेस्ट कर्मचारी करणार लॉकडाऊन आंदोलन!

Subscribe

बेस्ट प्रशासन त्यांच्यासाठी पुरेसे सुरक्षा सामुग्री पुरवत नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुंबई आणि उपनगरात पोलीस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, सरकारी यंत्रणा देवदूतांना घेऊन जाण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून विशेष बसेस फेऱ्या चालविण्यात येत आहे. या संकटकाळात जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता बेस्ट कर्मचारी आपली सेवा देत आहे. मात्र, बेस्ट प्रशासन त्यांच्यासाठी पुरेसे सुरक्षा सामुग्री पुरवत नाही. कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची देखभाल करत नसल्यामुळे येत्या सोमावरपासून बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीकडून आपल्या विविध मागण्या घेऊन १०० टक्के लॉकडाऊन पाळून प्रशासनाला उत्तर देतील, अशी माहिती बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस जगनारायन कहार यांनी दिली आहे.

बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती
बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती

कोरोना विषाणूमुळे बेस्ट कामगारांमध्ये बाधित आणि मृत्युमुखी पडणाऱ्या कर्मचार्‍यांची वाढती संख्या महाराष्ट्र शासन, महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे सर्रास दुर्लक्ष सुरू आहे. या महामारीच्या काळात मुंबई शहरामध्ये वीज पुरवठा आणि बृहन्मुंबई परिसरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा सातत्याने देण्याचं काम जीवाची पर्वा न करता बेस्ट कर्मचारी करत आहे. मात्र त्यांच्या आरोग्याकडे आणि दैनंदिन आवश्यक बाबीकडे बेस्ट प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. बेस्ट उपक्रमाच्या अनावस्थेमुळे कोरोनाबाधित बेस्ट कर्मचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढून ती आता शंभरच्या घरात पोहोचली आहे. बेस्ट कामगारांनी केलेल्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून पर्यायाने त्यांच्या आरोग्याकडे राज्य शासन, महापालिका आणि बेस्ट उपक्रमाने दुर्लक्ष केलेले आहे. दुसऱ्या बाजूला विविध कारणामुळे कर्मचारी इच्छा असूनही कार्यालयात उपस्थित होऊ शकला नाही, तर पगार कापण्याची धमकी देत आहे. ६०० पेक्षा जास्त कामगार क्वारनटाईन आहेत. जवळजवळ ६० टक्के कामगार कर्मचारी मुंबई शहर आणि उपनगरांच्या हद्दीबाहेर राहतात. त्यांना कामावर पोहोचण्यासाठी गाड्या उपलब्ध केलेल्या नाहीत, याबाबत मुख्यमंत्री, महापौर, पालिका आयुक्त तसेच बेस्टचे महाव्यवस्थापक यांच्या लक्षात आणू दिले. मात्र, आतापर्यंत लक्ष दिले नाही. त्यामुळे आता बेस्ट कामगार १०० टक्के लॉकडाऊन पाळून उत्तर देतील.

- Advertisement -

काय आहे मागण्या?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावेत, कोरोनाबाधित कर्मचाऱ्याची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी त्यांना सकस आहार देण्याची मागणी केली होती. कोविड- १९ दरम्यान काम करणाऱ्या बेस्ट कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सर्व साधने, मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, पीपीई किट्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावेत. सतत बेस्ट कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. सध्या कार्यरत असलेले कर्मचारी थकले आहेत, त्यांना कामातून विश्रांती द्यावी, बेस्ट कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यास त्यांची आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सहकार्याचे विलगीकरण प्रक्रिया राबवली जायला हवी. बेस्ट उपक्रमाच्या प्रत्येक आगारात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळेस कामगारांची कोरोनाबाबतीत चाचणी दैनंदिन पातळीवर करणे आवश्यक आहे, अशा अनेक मागण्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने केल्या आहे. मात्र बेस्ट उपक्रमाकडून सतत दुर्लक्ष करण्यात येत आहे.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना सुरक्षेचा पुरेशा वस्तू पुरविण्यात बेस्ट प्रशासन असमर्थ ठरत आहे. यासंबंधित अनेकदा तक्रारी सुद्धा केल्या. मात्र यांची दखल प्रशासनांकडून घेतली नाही. त्यामुळे आम्ही ठरवलं की, येत्या सोमवारपासून १०० टक्के लॉकडाऊन पाळून बेस्ट प्रशासनाला धडा शिकवायचा. 
– शशांक राव, बेस्ट संयुक्त कामगार समिती

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -