घरताज्या घडामोडीबेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची केंद्रात बदली

बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची केंद्रात बदली

Subscribe

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, (भा.प्र.से.) यांनी बेस्ट महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार नुकताच स्वीकारला आहे.

बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांची केंद्रात बदली करण्यात आली आहे. त्यांनी अतिरिक्त सचिव, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, (भा.प्र.से.) यांनी बेस्ट महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार नुकताच स्वीकारला आहे. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची बदली झाल्याने सुरेंद्रकुमार बागडे यांनी, बेस्ट महाव्यवस्थापकपदाचा कार्यभार ५ मे २०१७ रोजी स्वीकारला होता. सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट उपक्रमाला कोट्यवधी रुपयांच्या तोट्यामधून बाहेर काढण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकाळात बेस्टला मुंबई महापालिकेकडून सर्वात जास्त आर्थिक अनुदान मिळाले.

पालिका आयुक्तपदी अजोय मेहता असताना बागडे यांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसारच बेस्ट उपक्रमात आर्थिक शिस्त लावणे, खर्चात कपात करणे, अधिकारी वर्गाच्या भत्त्यांमध्ये कपात करणे, बेशिस्त कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे आदी प्रकारे आपल्या कामाचा खाक्या राखला होता. त्यांच्या कार्यकाळात बेस्टने काही प्रमाणात उत्पन्न वाढविण्यासाठी बसभाडे दरात वाढ केली होती. मात्र, पुढे अचानकपणे बेस्टचे भाडे ८ रुपयांवरून ५ रुपये इतके करण्यात आले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे बेस्टला आर्थिक शिस्त लागावी, खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी भाडे तत्त्वावरील बसगाड्या सुरू करण्यात आल्या. आता सुरेंद्रकुमार बागडे यांच्या जागेवर अन्य कोणत्याही अधिकाऱ्यांची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -