घरगणेशोत्सव 2022गणेशोत्सवानिमित्त मुंबईकरांसाठी 'बेस्ट' ऑफर; प्रवाशांसाठी खास प्लॅन तयार

गणेशोत्सवानिमित्त मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’ ऑफर; प्रवाशांसाठी खास प्लॅन तयार

Subscribe

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बेस्ट उपक्रमाने मुंबईकर जनतेसाठी एक आकर्षक योजना जाहीर केली आहे. यामध्ये बेस्ट चलो अॅप वापरणा-या प्रवाशांना 799 रुपयांचा सुपर सेवर प्लॅन केवळ 199 रुपयांना उपलब्ध होणार आहे म्हणजेच प्रवाशांना 75 टक्के सवलत मिळणार आहे.

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बेस्ट उपक्रमाने मुंबईकर जनतेसाठी एक आकर्षक योजना जाहीर केली आहे. यामध्ये बेस्ट चलो अॅप वापरणाऱ्या प्रवाशांना 799 रुपयांचा सुपर सेवर प्लॅन केवळ 199 रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजेच प्रवाशांना 75 टक्के सवलत मिळणार आहे. ही योजना 14 दिवसांकरिता वैध राहणार असून यामध्ये 20 रुपयांच्या 50 फेऱ्यांचा समावेश असणार आहे. (Best offer for Mumbaikars on the occasion of Ganeshotsav Special plan prepared for passengers)

जास्तीत जास्त मुंबईकरांना डिजीटल तिकीट प्रणालीकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीकोनातून सदर योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ बेस्ट चलो अँप वापरणारे विद्यमान प्रवासी तसेच नवीन प्रवासी या दोघांनाही मिळणार आहे.

- Advertisement -

योजनेचा लाभ कसा घ्याल?

गुगल प्ले स्टोअर मधून चलो अॅप डाऊनलोड केल्यानंतर बसपास सेक्शनमध्ये जाऊन सदर योजना शोधावी. गणेशोत्सव योजना निवडून प्रवाशांनी त्यांचा तपशील भरुन त्यांचा फोटो अपलोड करावा. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे तसेच नेट बँकिंग किंवा युपिआयद्वारे 199 रुपयाचे ऑनलाईन प्रदान करुन प्लान खरेदी करावा.

- Advertisement -

सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी Lise Now यावर क्लिक करावे. बसमध्ये चढल्यावर ‘Start a ‘Trip’ वर क्लिक करून तुमचा मोबाईल फोन बसवाहकाच्या तिकीट यंत्राजवळ वैधतेसाठी धरावा. वैधता पूर्ण झाल्यावर प्रवासाकरिता डिजिटल पावती उपलब्ध होईल. ही संपूर्ण प्रक्रिया कॅशलेस आणि पेपरलेस असणार आहे.

योजनेपासून मिळणारे लाभ

सदर योजनेत सहभागी झालेल्या प्रवाशांना 14 दिवसांच्या कालावधीमध्ये 50 फेऱ्यांचा लाभ मिळणार आहे. वातानुकुलीत तसेच विनावातानुकुलीत बसगाड्यांमध्ये 20 रुपयांपर्यंच्या सर्व तिकीटांवर प्रवासाची सुविधा उपलब्घ आहे. ही योजना 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत उपलब्ध असणार आहे.

बेस्टचा ‘हेरिटेज दूर बससेवा’ चालण्याचा निर्णय

दक्षिण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याकरीता बेस्ट उपक्रमाद्वारे खुल्या दुमजली बसद्वारे ‘हेरिटेज दूर बससेवा’ चालवली जाते. यंदा 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. तसेच, 8 सप्टेंबरपर्यंत मुंबईत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या 10 दिवसांच्या गणेशोत्सव कालावधीत दक्षिण मुंबईतील विविध गणपती मंडळांतील बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता, बेस्टने ‘हेरिटेज दूर बससेवा’ चालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, अतिरिक्त बस गाड्या चालवण्याचाही निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.


हेही वाचा – दारूविक्रीच्या मुद्द्यावरून अण्णा हजारे दिल्ली सरकारवर नाराज, केजरीवालांना लिहिलं पत्र

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -