Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई आजपासून बेस्ट सेवा सर्वसामान्यांना सुरू

आजपासून बेस्ट सेवा सर्वसामान्यांना सुरू

आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नसतील, मास्कचा वापर अनिवार्य

Related Story

- Advertisement -

मुंबईत उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्टची बसेसवा सुरू होत आहे. मात्र, कोणत्याही बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नसतील. याशिवाय मास्कचा वापर अनिवार्य असणार आहे. असे ‘बेस्ट’कडून कळवण्यात आले आहे.

मुंबईत लोकल प्रवास हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांपुरताच मर्यादित राहणार असला, तरी बस मात्र १०० टक्के प्रवासी क्षमतेसह धावणार आहेत. परंतु, बसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास असलेली मनाई कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय, मुंबई, ठाण्यात मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. मात्र, दुकाने खुली ठेवण्याची वेळ ४ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, हॉटेल्समध्येही क्षमतेच्या ५० टक्केे ग्राहकांना बसण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -