घरमुंबईमुंबईत आजपासून BEST बस २७ नव्या मार्गावर धावणार!

मुंबईत आजपासून BEST बस २७ नव्या मार्गावर धावणार!

Subscribe

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्टने बुधवार, आजपासून शहरात २७ नवीन बस मार्ग सुरू केले आहे. यामुळे आजपासून, बेस्ट उपक्रमाने सुरू केलेल्या २७ नवीन कॉरिडॉर मार्गांवरून मुंबईकर आता दर १५ मिनिटांनी बेस्ट बसने प्रवास करू शकणार आहे. या नव्या मार्गांपैकी सहा नवीन एसी आणि पाच सामान्य बस मार्गांव्यतिरिक्त आहेत जे १ सप्टेंबरपासून मुंबईकरांसाठी सुरू करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, प्रवाशांची संख्या लक्षात घेता बेस्ट बसने मुंबईतील बस मार्ग बदलले होते. मात्र आता ज्या मार्गावर प्रवाशांची वाढती आहे, अशा मार्गावर बेस्टबसेस धावताना दिसणार आहे. मुंबईसाठी हायस्पीड कॉरिडॉर सुरू करत आहोत जेणेकरून कार्यालयात जाणाऱ्यांना वेळेत बस मिळू शकेल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. तर नवीन कॉरिडॉर बसेसमध्ये पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीचा समावेश देखील असणार आहे, तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान कार्यालय जाणाऱ्यांनाही हा नवा मार्ग जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना महामारी दरम्यान दररोज साधारण २० लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात. मात्र कोरोना लसीचे दोन्ही डोस झालेल्या प्रवाशांसाठी स्वातंत्र्यदिनी लोकल ट्रेन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. यामुळे बेस्टने १५ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान प्रवासी संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट दरम्यान, शहरातील बेस्ट बसने साधारण ११ लाख प्रवाशांनी प्रवास केला. तर १५ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान, १० लाख प्रवाशांनी बेस्ट बसने प्रवास केला.


सणांवरुन राज-उद्धव आमने सामने, राज ठाकरे यांची शिवसेनेवर टीका

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -