घरमुंबईबेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचा मार्ग रखडलाच

बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचा मार्ग रखडलाच

Subscribe

लिज मॉडेलला युनियनचा विरोध कायम

बेस्ट प्रशासन खर्च बचत करण्यासाठी ऑगस्ट महिन्यांत भाडेतत्त्वावर 1000 बसगाड्या घेणार होते. मात्र अद्याप हा निर्णय रखडला आहे. बेस्ट वर्कर्स युनियनने याला विरोध करत आडमुठी भूमिका घेतल्याने हा तिढा आणखी वाढला आहे. याचा परिणाम मात्र बेस्ट अर्थकारणावर होऊ लागला आहे.

भाडेतत्वावर बस खरेदीला विरोध करत युनियनने न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे अतिरिक्त बसगाड्या रस्त्यावर आणण्यासाठीचे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरण हे तडजोडीच्या मार्गाने सोडवण्यासाठी नुकतीच बेस्ट प्रशासन आणि युनियनमध्ये बैठक झाली. या बैठकीला बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्ट व्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे आणि बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांच्यात बैठक झाली. बस भाडेतत्वावर घेऊन बेस्ट उपक्रमाला होणारा तोटा कमी करणे हे प्राधान्य असल्याची बाजू उपक्रमाने मांडली. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठीचा हा मार्ग आहे. मुंबईकरांच्या हितासाठी 1000 बसेसने ताफा वाढल्यास बेस्ट उपक्रमाचा महसूल वाढेल.

- Advertisement -

भाडेतत्वावरील बसेसमध्ये मिडी, मिनी, एसी बसेसचा समावेश आहे. मुंबईतील वाहतुकीसाठी या बसेस अतिशय गरजेच्या आहेत, तसेच भाडेतत्वावरील बसेसमुळे कामगार कपात होणार नाही. बेस्टच्या कामगारांशी संबंधित ग्रॅज्युटी, अंतिम देयके आणि इतर सवलती कामगारांना देण्याचे आश्वासन प्रस्तावित करण्यात आले. तसेच वेळेवर वेतन देण्यासाठीही उपक्रम प्रयत्न करणार असल्याचे बेस्ट उपक्रमाद्वारे सांगण्यात आले. पण युनियनने आपली आडमुठी भूमिका कायम ठेवत हा प्रस्ताव अमान्य केल्याची माहिती आहे.

2018-19मध्ये ताफ्यात येणार्‍या बसगाड्या – ४५०
2019- 20 वर्षात होणारी वाढ (सीएनजी बसेस) – ४४१

- Advertisement -

लीजवरच्या बसेस फायद्याच्याच
बेस्टने खरेदी केलेल्या बसेस आणि लीजवर घेतलेल्या बसेस यामध्ये मोठी तफावत आहे. लीजवर बसेस घेतल्याने 10 ते 15 टक्के इतकी खर्चाची बचत होणार आहे. सध्याच्या प्रत्येक बससाठी 100 रूपये प्रति कि.मी.खर्च येतो. यामध्ये बस खरेदीच्या खर्चापासून ते देखभाल आणि दुरूस्ती, इंधन तसेच कर्मचार्‍यांवर होणार्‍या खर्चाचा समावेश आहे. भाडे तत्वावरील बसेससाठी बस ऑपरेटर कंपनीला बसगाड्या उपलब्ध करून देणे, देखभाल-दुरूस्ती, इंधन, चालक या सर्वांची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. बेस्टकडून बसवाहक आणि पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बस भाडेतत्वावर देण्यासाठी सात वर्षांचा करार असणार आहे. सध्या तेलंगणा, हैद्राबाद, बंगळुरू, पुणे आदी शहरांमध्ये अशा भाडेतत्वावरील बसेसची सेवा सुरू आहे.

असे आहेत भाडे तत्वावरील बसगाड्याचे दर (रूपये प्रति किलोमीटर)
मिडी बस बिगर वातानुकूलित 45 रूपये
मिनी बस बिगर वातानुकूलित 41 रूपये
मिनी बस वातानुकूलित 48 रूपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -