मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार एसी डबलडेकर बस

बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाद्वारे प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अशातच आता प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता आणि प्रवासाचा दर्जा सुधारावा यासाठी बेस्ट उपक्रम आपल्या ताफ्यात एसी डबलडेकर बस दाखल करण्यात आहे.

best

बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाद्वारे प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अशातच आता प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता आणि प्रवासाचा दर्जा सुधारावा यासाठी बेस्ट उपक्रम आपल्या ताफ्यात एसी डबलडेकर बस दाखल करण्यात आहे. ऑगस्ट महिन्यात बेस्ट दिनानिमित्त डबलडेकर एसी बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. (BEST will add ac double decker bus for passengers in mumbai)

डबल डेकर बस तफ्यात दाखल झाल्यानंतर त्या बसची चाचणी घेतली जाणार आहे. सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही बस प्रवाशांच्या सेवेत आणली जाणार आहे. सध्या बेस्टकडे एकूण ४५ डबल डेकर बस आहेत. बेस्टच्या साध्या बसची प्रवासी क्षमता ५४ इतकी असून, डबल डेकर बसची प्रवाशी क्षमता ७४ इतकी आहे.

बेस्टची ही नवीन डबलडेकर बस भारत ६ श्रेणीमधील आहे. या बसला दोन स्वयंचलित दरवाजे आहेत. या दरवाजांचे संपूर्ण नियंत्रण हे चालकाकडे अरणार आहे. या बसमध्ये सीसीटीटीव्ही कॅमरा देखील असणार असून, बसचे गिअर हे स्वयंचलित आहेत. जवळपास बेस्टकडून अशा ९०० बस भाडे तत्वावर घेतल्या जाणार आहेत. तसेच, या बसच्या चार्जिंगसाठी मुंबईत ५० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

सध्या महापालिकेकडे एकूण ४५ डबलडेकर बस आहेत. आता तर प्रवाशांच्या सेवेत एसी डबलडेकर बस दाखल होणार आहे. येत्या सप्टेंबरपासून मुंबईकरांना एसी डबलडेकर बसचा लाभ मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा – शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटिसा, 7 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश