बेस्ट उपक्रम उत्पन्न वाढविण्यासाठी जागा भाड्याने देणार

कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू असलेल्या बेस्ट उपक्रमाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी व उत्पन्न वाढीसाठी कुलाबा ते मुलुंड - दहिसर पर्यंतच्या जागा व्यावसायिक वापरासाठी भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

'Chalo Mobile App' and 'Chalo Bus Card' available for BEST passengers
BEST झाली डिजिटल ; बेस्टच्या प्रवाशांसाठी 'Chalo Mobile App'आणि 'Chalo Bus Card' उपलब्ध

कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू असलेल्या बेस्ट उपक्रमाने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी व उत्पन्न वाढीसाठी कुलाबा ते मुलुंड – दहिसर पर्यंतच्या जागा व्यावसायिक वापरासाठी भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला भाजप, विरोधी पक्षाकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

बेस्ट उपक्रम गेल्या काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे. बेस्ट उपक्रमातील परिवहन विभाग आतापर्यंत कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू होता. आता बेस्ट वीज विभागही तोट्यात जाऊ लागला आहे. मात्र पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची राज्यातही सत्ता असल्याने आता बेस्टला आर्थिक मदत जास्त प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुंबई महापालिकेकडून बेस्टला काही कोटींची आर्थिक मदत अनेकदा करण्यात आली.

अगदी बेस्ट परिवहन विभागाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्टने ३८६ इलेक्ट्रिक बस गाड्या भाडे तत्वावर घेतल्या आहेत. त्यामुळे बेस्टचे या बसगाडयांच्या खरेदीसाठी खर्च होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. तसेच, कामगारांसाठी होणाऱ्या खर्चातही बचत होणार आहे.

बेस्टने यापूर्वीही उत्पन्न वाढीसाठी आपल्या २७ बस डेपोमधील काही जागा व्यावसायिक वापरासाठी भाडे तत्वावर दिल्या आहेत. आता पुन्हा एकदा बेस्ट उपक्रम आपल्या कुलाबा ते दहिसर – मुलुंड पर्यन्तच्या २० ठिकाणच्या जागा भाडे तत्वाने देणार आहे. त्यामुळे बेस्टला जागेच्या अनामत रकमेपोटी व भाड्यापोटी काही कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रियेला बेस्ट उपक्रमाने सुरुवात केली आहे.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा – देवयानी फरांदे