वसाहतीतील घर फुकट नको, विकत द्या; बेस्ट कर्मचाऱ्यांची मागणी

या मागणीचे निवदेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेल्या आठवड्यात देण्यात आले. यांसदर्भात २२ जानेवारीला वडाळा बेस्ट वसाहतीत एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वसाहतीतील घरांच्या मालकी हक्कासाठी सभेत चर्चा केली जाणार आहे. पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

worker attendance decreases at wadala best depot
'त्या' वृत्तामुळे वडाळा बेस्ट आगारातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटली!

 

मुंबईः बेस्ट कर्मचाऱ्यांना वसाहतीतील घराची मालकी हवी आहे. मालकी हक्क फुकट नको. बाजारमूल्य भावाने पैसे घेऊन घराची मालकी द्यावी, अशी मागणी बेस्ट कर्मचारी कुटुंबिय हाऊसिंग सोसायटीने ( नियोजित ) केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र देऊन ही मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त व बेस्टचे महाव्यवस्थापक यांची संयुक्त बैठक बोलवण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे, अशी माहिती सोसायटीच्यावतीने नितीन कदम यांनी दिली. वडाळ्यात बेस्ट वसाहतीची सुमारे दोनशे घरे आहेत. तर संपूर्ण मुंबईतील बेस्ट वसाहतीत अंदाजे साडेतीन हजार घरे आहेत. येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर घर सोडावे लागते. मुंबईत घर घेणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. बेस्ट कर्माचारी मुंबईत हक्काचे घर घेऊ शकत नाही. निवृत्तीनंतर त्यांना मुंबईतून हद्दपार व्हावे लागते. परिणामी कर्मचारी राहत असलेल्या घराची मालकी द्यावी. मालकी फुकट नको. बाजारमूल्य भावाने घराची मालकी द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

या मागणीचे निवदेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेल्या आठवड्यात देण्यात आले. यांसदर्भात २२ जानेवारीला वडाळा बेस्ट वसाहतीत एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. वसाहतीतील घरांच्या मालकी हक्कासाठी सभेत चर्चा केली जाणार आहे. पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

शतकापासून बेस्ट मुंबईकरांना सेवा देत आहे. वीज पुरवठा व परिवहन सेवा देत आहे. १५ जुलै १९२६ पासून बेस्टने बस गाड्या चालवायला सुरुवात केली आणि १९४७ मध्ये देश स्वतंत्र होण्याच्या एक आठवडा आधीच बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली. आता महानगरपालिकेच्या अखत्यारीत असूनही, बेस्टचा स्वतंत्र कारभार चालतो. गेल्या काही वर्षांपासून बेस्ट आर्थिक तोट्यात चालली आहे. बेस्ट प्रशासनाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने आर्थिक मदतही केली. बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रीक गाड्या आल्या. कोरोनाकाळात बेस्टने मुंबईकरांना सेवा दिली. बेस्ट मुंबईकरांना अविरत सेवा देत आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना वसाहतीतील हक्काचे घर मिळायला हवे, अशी मागणी करण्यात आली आहे.