घरमुंबईबेस्ट कामगारांचा उद्या पालिकेला घेराव

बेस्ट कामगारांचा उद्या पालिकेला घेराव

Subscribe

बेस्ट कामगार सेना ६ जुलै रोजी पालिकेला घेराव घालणार आहे. पालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापकांना हटवण्याची मागणी कामगारांनी केली असून उद्या सर्व बेस्ट कामगार आझाद मैदानात एकत्र जमणार आहेत.

गेल्या काही वर्षांत बेस्ट तोट्यात चालली असून त्याचा फटका बेस्टच्या कामगारांना बसत आहे. त्यामुळेच मुंबई महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक हटावची मागणी जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेना आक्रमक झाली असून शुक्रवार, ६ जुलै पालिकेला घेराव घालण्यात येणार आहे. बेस्ट सेवा ही या अधिकाऱ्यांच्या आठमुठ्या धोरणामुळे तोट्यात जात असल्याचा आरोप शिवसेना प्रणित बेस्ट कामागार सेनेने करत पालिका आयुक्त अजॉय मेहता आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांना हटविण्यासाठी २० जून पासूनच सभांच्या माध्यमातून मोहीम आखली असून उद्या चक्क पालिकेला घेराव घालण्यात येणार आहे.

… म्हणून कामगार सेना आक्रमक

बेस्टमधील सद्यस्थिती, बेस्ट प्रशासनचे आडमुठे धोरण, बेस्ट महाव्यवस्थापकांचा ‘हम करें सो कायदा, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची रोखून धरलेली ग्रॅच्युएटी, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा अचानक बंद केलेला एक वर्षाकरताचा मोफत बसपास, रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता, कालबाह्य झालेल्या ट्रायमॅक्सच्या ETIM मशीनमुळे बेस्टचं होणारं करोडोंच नुकसान, बेस्टचा विलीनीकरणाचा रोखून धरलेला ठराव, यामुळे कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. या आंदोलनामध्ये बेस्टमधील शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेना, विद्युत पुरवठा विभागातील मान्यताप्राप्त कामगार संघटना, मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन व बेस्ट कामगार क्रान्ती संघ सहभागी होणार आहेत.

गेल्या एक महिन्यापासून प्रत्येक डेपोवर आम्ही द्वारसभा घेतली. हे दोघे जो पर्यंत हटणार नाहीत तोपर्यंत बेस्ट आणि पर्यायाने पालिकेचे काही खरे नाहीत. त्यामुळे मोठ्या संख्येने या एल्गार आंदोलनात सहभागी व्हा.
– सुहास सामंत, अध्यक्ष, बेस्ट कामगार सेना

- Advertisement -
best kamgar union
बेस्ट कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

प्रत्येक डेपोवर द्वारसभा

विशेष म्हणजे या आंदोलनाची तयारी गेल्या एक महिन्यापासून करण्यात येत असून, बेस्टच्या प्रत्येक डेपोवर संघटनांनी द्वारसभा घेऊन कामगारांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी सुरुवातीला आझाद मैदान येथे सर्व संघटना आणि कामगार एकत्र जमून त्यानंतर पालिकेला घेराव घालणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -