घरCORONA UPDATEबेस्ट कामगारांनी लॉकडाऊन मागे घेत घडवला इतिहास

बेस्ट कामगारांनी लॉकडाऊन मागे घेत घडवला इतिहास

Subscribe

परिस्थितीची जाणीव ठेवत आणि स्वतःच्या व कुटुंबाच्या हितापेक्षा देशहित सर्वतोपरी ठेवत सकाळी बेस्ट कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन मागे घेतले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा संपाची हाक देत, पूर्ण ताकतीने संप यशस्वी सुद्धा करून दाखविला आहे. त्याच प्रमाणे सोमवारी बेस्ट प्रशासनाविरोधात शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय बेस्ट संयुक्त कृती समितीकडून घेण्यात आला होता. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होणार होते. मात्र, परिस्थितीची जाणीव ठेवत आणि स्वतःच्या व कुटुंबाच्या हितापेक्षा देशहित सर्वतोपरी ठेवत सकाळी बेस्ट कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन मागे घेतले आहे. त्यामुळे सर्वत्र बेस्ट कर्मचाऱ्यांचे कौतूक तर होत आहेच. त्याच प्रमाणे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सुद्धा कर्मचारी संघटनेचे आभार मानले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून बेस्ट प्रशासनाला आणि मुंबई महापालिका प्रशासनाकडे बेस्ट कर्मचाऱ्यांचा सुरक्षेसाठी सुरक्षा सामुग्री, पुणे महापालिकेच्या धर्तीवर बेस्ट कर्मचाऱ्यांना १ कोटीचे विमा कवच तसेच इतरही मागण्या केल्या होत्या. मात्र, सतत मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनाला धडा शिकविण्यासाठी आणि लक्ष वेधण्याकरिता बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सोमवारपासून शंभर टक्के आंदोलन पाळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाचा या जागतिक संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारीसह इतर अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी आपली सेवा देत आहे. त्यांची गैरसोय होणार असल्यामुळे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने बेस्ट प्रशासनाविरोधात घरीच थाबून शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय सोमवारी सकाळी मागे घेतला आहे.

- Advertisement -

बेस्ट उपक्रमाचा इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत आंदोलन मागे घेण्याची पहिलीच घटना आहे. यापूर्वी २००७ रोजी दोन दिवस संप केला होता. त्यानंतर २०१४, २०१७ ला दोन ते तीन दिवस संप केला होता. मात्र, गेल्या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांनी तब्बल ९ दिवसांचा संप करून बेस्ट कर्मचाऱ्यांनी इतिहास घडवला होता. आज संकटकाळात बेस्ट कर्मचाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आणि देशहितासाठी संप मागे घेतल्यामुळे सर्वत्र बेस्ट कर्मचारी संघटनांवर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांची काळजी घ्या!  

आतापर्यंत कोरोनामुळे १६ बेस्ट कर्मचाऱ्यांचा बळी गेला असताना १०० हून अधिक बेस्ट कर्मचारी कोरोनाबाधित आहे. तर ६०० पेक्षा जास्त बेस्ट कर्मचारी विलगीकरण कक्षात आहे. बेस्ट कर्मचारी या संकटकाळात देशहित सर्वतोपरी मानून कामावर उपस्थित राहतात, याचं कौतूक करावं तेवढं कमी आहे. दुसऱ्या बाजूला गेल्या चार दिवस महाराष्ट्र सरकार सर्वांची जबाबदारी झटकून बघ्याची भूमिका घेत राहिली. तर महापौरांनी चक्क बेस्ट कामगारांच्या जागी नवीन नोकर भरतीची उद्दाम भाषा केली, याचा आम्ही निषेद करतोच आता तरी महाराष्ट्र सरकारने बेस्ट कामगारांच्या आरोग्याची आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, अशी प्रतिक्रिया बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे शशांक राव यांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -