घरCORONA UPDATEबेस्टच्या हजाराहून अधिक कर्मचार्‍यांची कोरोनावर मात!

बेस्टच्या हजाराहून अधिक कर्मचार्‍यांची कोरोनावर मात!

Subscribe

कोरोना विरुद्धच्या लढाईतील गेल्या पाच महिन्यापासून बेस्ट कर्मचार्‍यांना दोन हात करत आहे. आपली सेवा देत असताना बेस्टमधील कोरोनाग्रस्त कर्मचार्‍यांची संख्या झपट्यांनी वाढली होती. आतापर्यंत १ हजार ८६० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र  बेस्ट उपक्रमामध्ये कार्यरत असणार्‍या एकूण १ हजार ६७२ बेस्ट कर्मचार्‍यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. यातील शेकडो कर्मचारी पुन्हा कामावर सुध्दा रुजू झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू होता. त्या पहिल्या दिवसापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची वाहतूकीची जबाबदारी बेस्टने यशस्वीपणे सांभाळली आहे. बेस्टचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपली सेवा अविरत देत आहेत. सध्याच्या घडीला बेस्टमधील १ हजार ८६० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये चालक, वाहक, निरिक्षक, विद्युत विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यापैकी बेस्टच्या १ हजार ६७२ कर्मचार्‍यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये १ हजार १२२ चालक-वाहक, विद्युत विभागातील २७९ तर अभियांत्रिकी विभागातील १७१ आणि ईतर विभागातील ६८ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. बेस्टमध्ये कोरोनाग्रस्त ९० टक्के कर्मचार्‍यांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. बेस्टच्या कर्मचार्‍यांभोवती एप्रिल महिन्यापासुनच कोरोनाचा विळखा घट्ट झाला. बेस्टमधील ३ कर्मचार्‍यांनी एप्रिल महिन्यात,  मे महिन्यात १४९, जूनमध्ये ३३२, जुलै महिन्यात ६६१ तर ऑगस्ट महिन्यात आत्तापर्यत ४९५ कर्मचार्‍यांनी कोरोनावर मात केली आहे. तर उर्वरित कर्मचारी विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – Video : खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – प्रविण तरडे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -