घरमुंबईआता विना वाहक बेस्ट बस धावरणार

आता विना वाहक बेस्ट बस धावरणार

Subscribe

बेस्टची पॉईंट टू पॉईंट सेवेला मान्यता,७५ बेस्ट मार्गांवर सुरु होणार योजना

बेस्टने ऐतिहासिक भाडे कपात केल्यानंतर आता बेस्टने विना वाहक बेस्ट बसगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याला राज्य परिवहन महामंडळाने मान्यताही दिली आहे. त्यानुसार मुंबई शहरासह उपनगरातील एकूण ७५ बेस्ट मार्गांवर पॉईंट टू पॉईंट बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांबरोबर बेस्ट प्रशासनालाही याचा फायदा होणार आहे.
बेस्ट प्रशासनाने 9 जुलैपासून ऐतिहासिक दरकपात केल्याने साध्या बसचे किमान तिकीट पाच रुपये,तर एसी बसचे सहा रुपये तिकीट झाल्याने मुंबईकरांनी बेस्टच्या स्वस्त आणि मस्त प्रवासाला भरघोस प्रतिसाद दिला आहे. मात्र एका महिन्यातच प्रवासी संख्या ९ लाखाने वाढल्यामुळे बेस्टने प्रवाशांना सुविधा देण्यासाठी आता बेस्टच्या पॉईंट टू पॉईंट बस सेवेला राज्य परिवहन महामंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता बेस्टच्या ७५ मार्गावर विना कंडक्टरच्या बस धावणार आहेत.

बेस्टच्या एका अधिकार्‍याने सांगितले कि, मुंबईतील बेस्ट मार्गाचा पूर्ण अभ्यास करून ७५ मार्गांची निवड करण्यात आली आहे. या मार्गावर एका पॉईंट वरून दुसर्‍या पॉईंटपर्यंत बस सेवा चालविण्यात येणार आहे. या सर्व बसेसला एकच दर असणार आहे. विशेष म्हणजे पॉईंट टू पॉईंट बस सेवा एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणापर्यंतच धावणार आहे. या सेवा अंतर्गत साध्या बसेसला ५ रुपये तर वातानुकूलित बस गाडीला ६ रुपये दर असणार आहे. हे ७५ मार्ग मुंबई शहर आणि उपनगरातील रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक, एसटी स्थानक, पर्यटन स्थळ आणि व्यावसायिक संकुल परिसरापर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे या पॉईंट टू पॉईंट बस सेवामध्ये प्रवाशांना आगोदर तिकीट काढावे लागेल. त्यानंतर बसमध्ये प्रवास करता येणार आहे.

- Advertisement -

बेस्टला आणि प्रवाशांना होणार फायदा पॉईंट टू पॉईंट बस सेवेला म्हणजे विना-वाहक एकच थांबा बस सेवा बेस्टने सुरु करणार आहे. त्यामुळे प्रवाशांबरोबर बेस्टला मोठा फायदा होणार आहे. सोबतच बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होणार असल्याचे बोलण्यात येत आहे. पूर्वी बेस्टला चढ-उतार, बस स्टँडवरील थांबा यामध्ये प्रवाशांच्या खूप वेळ वाया जायचा. त्यामुळे नाईलाजाने प्रवासी खासगी वाहनांतून प्रवास करायचे. मात्र आता बेस्टच्या पॉईट टू पॉईट बस सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. सोबतच वाहकांवर होणारा खर्च सुद्धा बेस्टचा वाचणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -