घरमुंबईवांद्रे भाभा रुग्णालयाचे नुतनीकरण; ४९७ खाटांचे रुग्णालय होणार!

वांद्रे भाभा रुग्णालयाचे नुतनीकरण; ४९७ खाटांचे रुग्णालय होणार!

Subscribe

वांद्र्यातल्या भाभा हॉस्पिटलचे नुतनीकरण होणार असून त्या ठिकाणी बहुमजली प्रशस्त इमारत उभी करण्यात येणार आहे.

वांद्य्रातील भाभा रुणालयाचे नुतनीकरण करण्यात येत असून सध्या असलेल्या रुग्णालयाच्या जागेवर बारा मजल्यांची इमारत उभी केली जाणार आहे. जुन्या असलेल्या तळ मजल्याच्या जागेवर ही बहुमजली इमारत उभारली जाणार आहे. बहुमजली इमारतीचे बांधकाम आणि नुतनीकरण करण्यात येणार आहे. ४९७ खाटांचे प्रशस्त असे हे रुग्णालय उभारले जाणार आहे.

२५५ कोटींचा खर्च

वांद्रे पश्चिम येथील महाापालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात येणार असून पूर्वी असलेल्या तळमजली इमारतीचे बांधकाम पाडून त्याठिकाणी बहुमजली इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर अस्तित्वात असलेल्या बहुमजली इमारतीची दुरुस्ती करून नुतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. २५५ कोटी रुपये खर्च करून रुग्णालय इमारत उभारली जाणार आहे. यासाठी क्वॉलिटी हाईटकॉन प्रायव्हेट कंपनीची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मरणारी मुंबई आणि स्पिरीटवाला मुंबईकर!

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक

या रुग्णालय इमारतीचे आराखडे आणि संरचनात्मक नकाशे बनवण्यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून स्कायलाईन आर्किटेक्ट्स यांची नेमणूक केलेली आहे. सध्याच्या तळ मजल्याच्या तोडण्यात येणार्‍या जागेवर दोन तळघर तसेच तळ मजला आणि त्यावर १२ मजल्यांचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाच्या अभियंत्यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -