घरमुंबईसेक्स करून केली वहिनीची हत्या, गुन्ह्याची दिली कबुली

सेक्स करून केली वहिनीची हत्या, गुन्ह्याची दिली कबुली

Subscribe

अक्सा बीच कॉटेज हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मागच्या आठवड्यात इंदू तातड (३३) ही महिला मृतावस्थेत सापडली होती. तिचाच चुलत दीर हरीश तातड (३०) यानं विवाह्यबाह्य संबंधातून ही हत्या केल्याचं उघड झालंय. हरीशनं हत्या केल्याची कबुली नवसारी पोलीस स्टेशनमध्ये दिली.
मिड-डे वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, इंदूची हत्या करून हरीशनं तिला तशाच परिस्थितीतून सोडून पळ काढला होता. स्वतः जखमी असलेला हरीश बस पकडून गुजरातला पळून गेला होता. हरीश जखमी असल्याचं बसमध्ये कंडक्टरला लक्षात आल्यानंतर त्यानं नवसारीला बस थांबवून तात्काळ सेवा दिली. तिथेच पोलीस स्टेशनमध्ये हरीशनं हत्येची कबुली देऊन इंदूच्या नवऱ्यालादेखील बोलावून घेतलं.

नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी?

हरीशने पोलिसांसमोर त्या दिवशी रुममध्ये नेमके काय घडले त्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. इंदूच्या आयुष्यात हरीश एकमेव पुरुष नसून तिचे अन्य पुरुषांबरोबरही अनैतिक संबंध असल्याचं त्याला कळलं. इंदूचे अन्य पुरुषांबरोबरच्या लैंगिक संबंधांचे व्हिडिओ हरीशने पाहिले होते. इंदू आणि हरीश अक्सा बीचवरच्या कॉटेजमध्ये भेटले. त्यानंतर त्यांनी सेक्स केला. सेक्स झाल्यानंतर वॉशरुममधून बाहेर आल्यावर इंदूनं बॅगेतून आणलेला चाकू काढून त्याला धमकवायला सुरुवात केली. आपले इतर संबंध त्याला कळल्याचं तिच्या लक्षात आल्यामुळेच तिनं हे पाऊल उचललं.
मालवणी पोलिसांनी हरीशनं दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये झटपट झाली आणि त्या झटपटीत हरीशनं चाकू हिसकावून घेऊन तिच्यावर वार केले. तिनं आधी केलेल्या वारामुळे त्याच्याही अंगातून रक्त वाहत होते. तो तिला रक्ताच्या थारोळ्यात तशाच नग्न अवस्थेत सोडून निघाला आणि गुजरातच्या बसमध्ये जाऊन बसला.

- Advertisement -

‘मला फसवत असल्यामुळेच मी तिला मारलं’

पोलिसांनी दिलेल्या जबाबात आपल्या वहिनीचे आपल्याव्यतिरिक्त इतर माणसांबरोबरही शरीरसंबंध होते. त्याचे व्हिडिओ आपण पाहिले होते. तिने मला फसवलं त्यामुळेच मी तिला मारलं अशी कबुली दिली आहे. तिनं चाकूनं धाक दाखवल्यानंतर चाकू हिसकावून तिला मारल्याचंदेखील त्यानं कबूल केलं आहे. दरम्यान, सध्या हरीशला सुरतच्या रूग्णालयात हलवण्यात आलं असून, त्याच्यावर नजर ठेवण्यात आली आहे. बरा झाल्यावर लगेच त्याला अटक करण्यात येईल असं मालवणी पोलिसांनी सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -