मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीविरोधात कोर्टात जाणार – भाई जगताप

Bhai Jagtap

मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली. महापालिकेच्या सोडतीत 236 जागांपैकी 109 जागा महिलांसाठी राखीव, 15 अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पण या सोडतीवर काँग्रेसने आक्षेप घेतला असून दिलेल्या सूचना आणि हरकतींचा विचार करण्यात आला नाही. ही आरक्षण सोडत बायस असून अन्यायकारक आहे. त्याविरोधात आम्ही कोर्टात जाऊन दाद मागू, असे काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे. आरक्षण सोडतीमागे शिवसेनेचा डाव तर नाही ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसला अधिक त्रास होईल अशा पद्धतीने ही आरक्षण सोडत निघाली असेदी भाई जगताप म्हणाले.

या सोडतीचे गणित आमच्या लक्षात आले नाही –

काँग्रेसच्या 29 नगरसेवकांपैकी 21 नगरसेवकांच्या वार्डात महिला आरक्षण पडले आहे. हा योगायोग म्हणता येणार नाही. लॉटरी 23 जागांसाठीच काढली गेली. बाबू खान यांचा वॉर्ड क्रमांक 190 अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला. लोकसंख्येनुसार आरक्षण ठरते. 195 वॉर्डमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 27 टक्के आहे. इतर प्रभागात ही अनुसूचित जाचीती लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या सोडतीचे गणित आमच्या लक्षात आले नाही असे काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे.

महापालिका आयुक्त आणि शिवसेनेने मिळून हे केले –

दिक्षिण मुंबईत 30 वार्ड असून 21वार्ड महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. हे कसे शक्य आहे? इतर ठिकाणी काही प्रमाणात अशीच स्थिती आहे. कुर्ला भागात आरक्षण टाकले. मागच्या वेळी तिथे आरक्षण नव्हते. 2012मध्ये हा वॉर्ड ओबीसी महिलांसाठी राखीव होता. मात्र, तो निकष कुठे लगतो? हे आरक्षण पूर्णपणे बायस आणि पूर्वग्रहदूषित आहे. महापालिका आयुक्त आणि शिवसेनेने मिळून हे केले आहे. आमच्या सूचना आणि हकतीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे भाई जगताप यांनी स्पष्ट केले.