घरताज्या घडामोडी"BMC"ने मुंबई एका आठवड्यात खडेमुक्त करावी अन्यथा आंदोलन करु, भाई जगताप यांचा...

“BMC”ने मुंबई एका आठवड्यात खडेमुक्त करावी अन्यथा आंदोलन करु, भाई जगताप यांचा इशारा

Subscribe

महापालिका वसाहतींमधील नागरिक व गाळेधारकांवर कर आकारणे बेकायदेशीर आहे.

मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सगळीकडे खड्डेच खड्डे असे चित्र साधारणपणे सगळीकडे दिसत आहे. यावरुन काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबई महानगरपालिकेला इशारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेने लवकरात लवकर एका आठवड्याच्या आत मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरु करावी, तसे न झाल्यास या विरोधात मुंबई काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा भाई जगताप यांनी दिला आहे.

मुंबईत गेल्या महिन्याभरामध्ये झालेल्या पावसामध्ये रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. सगळीकडे खड्डेच खड्डे असे चित्र साधारणपणे सगळीकडे दिसत आहे. या खड्ड्यांमुळे डोणारे अपघात. वाडतूक कोंडी अशा अनेक समस्यांना मुंबईकर नागरिकांना नेहमीच तोंड द्यावे लागत आहे. मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम मागील काडी वर्षांपामून मुरु केलेले आहे. पण डांबरी रस्त्यांसोबत आता काँक्रीटच्या रस्त्यांवर सुद्धा खडडे पडू लागले आहेत. पहिल्याच पावसामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून देखील हजारो ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य का झाले आहे? पालिकेच्या एॅपवर किंवा अभियंत्यांच्या व्हाट्सएप तक्रार केल्यानंतर महापालिकेकडून एक-दोन दिवसांत खड्डे बुजवले जात आहेत.

- Advertisement -

परंतु त्यासाठी जे मिश्रण (कोल्ड मिक्स) वापरले जाते. ते अतिशय हलक्‍या दर्जाचे आहे व त्यामुळे ते पावसात वाहून जात आहे. असा माझा आरोप आहे. तरी या बाबतीत पालिका प्रशासनाने लवकरात लवकर एका आठवड्याच्या आत कार्यवाढी करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा भाई जगताप यांनी दिला.

पूरग्रस्तांना मदत करणार

अतिवृष्टीमुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातार व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषत: कोकण पट्ट्याला त्याचा पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अनेकांचे प्रचंड हाल झालेले आहेत. अनेकांचे घर संसार वाहून गेले. खूप मोठया प्रमाणात सगळ्यांचे नुकसान झालेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात नुकसान झालेले आहे. परंतु पूरपरिस्थिती सुदैवाने व प्रशासनाच्या हालचालींनी आता ओसरू लागली आहे. परंतु रत्नागिरी व ययगड जिल्ह्यामध्ये विशेषत: महाड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा अशा ७ तालुक्‍यांमध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे. म्हणूनच मुंबई काँग्रेसतर्फे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पूरग्रस्त भागातील काँग्रेस नेत्यांच्या बैठक घेण्यात आल्या.
सर्वप्रथम मुंबई काँग्रेसतर्फे या पूरग्रस्त विभागाचा आढावा घेण्यात आला व या विभागात अत्यावश्यक सामग्री आणि वैद्यकीय सेवा पोहचविण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

या पुरग्रस्तांचा संसार उभा करण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे साधारणपणे २ कोटी रुपयांची अत्यावश्यक सामग्री पाठविण्यात येणार आहे. त्यात साधारणपणे १० हजार ब्लॅकेटस, १० हजार चटई तसेच. तसेच प्रत्येकाला एक किट देण्यात येईल. ज्यामध्ये कपडे, मेडिकल किट, अन्यधान्य. गृहोपयोगी भांडी व संसाधने असणार आहेत. आमचे एक वैद्यकीय पथक सुद्धा तिथे जाणार आहे. या सामग्री खरेदीसाठी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड. मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा. माजी मंत्री सुरेश शेट्टी, आमदार अमीन पटेल यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच मुंबई काँग्रेसतर्फे पूरग्रस्त मदतकार्य समन्वय कारण्यासाठी एक मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच मुंबई काँग्रेसतर्फे जनतेला आवाहन करण्यात येत आहे की. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी व अत्यावश्यक सामग्री पोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन सढळ हस्ते मदत करवी. असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान केले.

गाळेधारकांवर कर आकारणे बेकायदेशीर

भाई जगताप पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या मालकीच्या ज्या बीआयटी चाळी आहेत. त्यामध्ये राहणारे रहिवासी व इतर पालिकेच्या वसाहतीतील गाळेधारकांकडून मुंबई महापालिकेने २०१७ पासूनचा मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे. या निर्णयाला मुंबई काँग्रेसचा ठाम विरोध आहे. मुळातच स्वत:च्या मालकीच्या मालमत्तेवर महापालिका मालमत्ता कर आकारू शकत नाही. तसेच या चाळींमध्ये राहणारे रहिवासी व गाळेधारक वर्षानुवर्षे महानगरपालिकेला भाडे देत आहेत. मग त्यांच्यावर तुम्ही मालमत्ता कर कसा काय आकारू शकता? सुमारे ४६ हजार पेक्षा जास्त रहिवासी व गाळेधारक यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या अनुचित मालमत्ता कर आकारणीविरोधात आवाज उठवला होता. तसेच स्थायी समिती व महापालिका सभागृहाची मंजुरी न घेता अशा प्रकारे महापालिका वसाहतींमधील नागरिक व गाळेधारकांवर कर आकारणे बेकायदेशीर आहे. हा कर तात्काळ रद्द करावा अशी आमची मागणी आहे. या प्रकरणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -