घरक्राइमभजन गायक दीपक पुजारीला विनयभंगप्रकरणी अटक, GRP पोलिसांची कारवाई

भजन गायक दीपक पुजारीला विनयभंगप्रकरणी अटक, GRP पोलिसांची कारवाई

Subscribe

भजन गायक दीपक पुजारी यास अटक केली आहे. बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा दीपक पुजारी याच्यावर आरोप आहे.

भजन गायक दीपक पुजारी यास अटक केली आहे. बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा दीपक पुजारी याच्यावर आरोप आहे. प्राप्त तक्रारीवरुन सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) ही कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ जीआरपी पोलीस अनिल कदम यांनी दिली. (bhajan singer Deepak Pujari arrested by the GRP for allegedly molesting a college student in Mumbai)

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात भजन गायक दीपक पुजिरी याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. आरोपी दीपक हा भोजपुरी गायकही आहे. आरोपी दीपक पुजारीने विद्यार्थीनीवर घृणास्पद कृत्य केले, त्यावेळी तिने रेल्वे स्थानकावर आरडाओरड केली. विद्यार्थीनीने आरडाओरडा केल्याने दीपकने तेथून पळ काढला.

- Advertisement -

आरोपी दीपक पुजारीने पळ काढताच संबंधित विद्यार्थीनीने बोरिवली स्थानकातील गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांना (जीआरपी) या प्रकाराची माहिती दिली. तसेच, दीपक पुजारी विरोधात तक्रार दाखल केली. विद्यार्थीनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ दीपकचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही वेळातच दीपक पुजारी याला पालघर जिल्ह्यातील विरार भागातून पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर आरोपी दीपकला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने दीपक पुजारीला पोलीस कोठडी सुनावली.

याप्रकरणी बोरिवलीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल कडमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भजन गायक दीपक पुजारी याने बोरिवली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी पत्ता विचारला आणि त्यानंतर तिच्याशी गप्पा मारत होता. काही वेळाने त्याने गैरवर्तन करून विद्यार्थिनीची छेड काढण्यास सुरुवात केली. मात्र, विद्यार्थ्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तसेच, आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यानंतर भजन गायक दीपक पुजारी याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, तो एक भजन गायक असून, अनेक भोजपुरी अल्बममध्ये गाणीही गायली आहेत. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.


हेही वाचा – ठाकरे पुन्हा अडचणीत? पालघर साधु हत्या प्रकरण CBIकडे देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -