Eco friendly bappa Competition
घर मुंबई Bhandup Landslide : संरक्षक भिंतीमुळे दुर्घटना टळणार; मनोज कोटक

Bhandup Landslide : संरक्षक भिंतीमुळे दुर्घटना टळणार; मनोज कोटक

Subscribe

मुंबई: मुंबईत दरवर्षी डोंगराळ भागात दरडी कोसळून दुर्घटना घडतात. त्यामध्ये वित्तीय व जिवीत हानी होते. मात्र यंदा भांडूप, खिंडीपाडा येथील डोंगराळ भागात मोठी व मजबूत संरक्षक भिंत उभारण्यात येत असल्याने सदर दुर्घटनांपासून झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असा आत्मविश्वास भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रातील भाजपशासित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कारकिर्दीला नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. यानिमित्ताने केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षात जनतेसाठी राबविलेल्या विविध योजना, विविध विकासकामे आदींची माहिती देण्यासाठी खासदर मनोज कोटक यांनी मंगळवारी विद्याविहार येथे एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये, खा. कोटक यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी, भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील नाले सफाईची पाहणी

मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने डोंगराळ भागात राहणाऱ्या रहिवाशांना, झोपडीधारकांना जागा खाली करण्यासाठी व स्थलांतर करण्यासाठी नोटिसा देते. मात्र झोपडीधारक पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने स्वतःची जागा सोडत नाहीत. परिणामी पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास त्याचा मोठा फटका झोपडीधारकांनाच बसतो.  ही गंभीर बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासन दरवर्षी विविध उपाययोजना राबवते.

नऊ कोटींची संरक्षक भिंत

- Advertisement -

यंदा भांडूप खिंडीपाडा परिसरातील डोंगराळ भागात ९ कोटी रुपये खर्चून मोठी संरक्षक भिंत उभारत आहे. सध्या भिंतीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पुढील टप्प्यात आणखीन ७ कोटी रुपये खर्चून आणखीन एका ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्यात येणार असल्याचे खासदार मनोज कोटक यांनी सांगितले. या संरक्षक भिंतीमुळे भांडूप येथे डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे खा. कोटक यांनी सांगितले.

दरड कोसळण्याची भीती असलेली ठिकाणे

मुंबईत कुर्ला, कांजूरमार्ग, सूर्यनगर, घाटकोपर, खैरानी रोड, भांडुप, विक्रोळी, मालाड आप्पापाडा आदी परिसरात डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो झोपड्या बेकायदा उभारण्यात आलेल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. त्यामुळे जिवीत व वित्तीय हानी कमी – अधिक प्रमाणात होत असते.

 

- Advertisment -