घरमुंबई'भारतमाता की जय' च्या जयघोषाने परिषद दणाणले!

‘भारतमाता की जय’ च्या जयघोषाने परिषद दणाणले!

Subscribe

वायुसेनेने बजाविलेल्या कामगिरीचे कौतुक करताना जवळपास सर्वच सदस्यांनी 'भारतमाता की जय' आणि 'वंदे मातारम' या जयघोषांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या उत्तर देत भारतीय वायुसेनेने मंगळवारी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांची तळे उध्दवस्त केली. वायुसेनेने केलेल्या या कारवाईचे देशभरातून स्वागत केले जात असताना त्याचे पडसाद मंगळवारी महाराष्ट्र विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही दिसून आले. विधानसभे पाठोपाठ विधान परिषदेतही वायुसेनेने बजावलेल्या या कामगिरीचे कौतुक करताना जवळपास सर्वच सदस्यांनी ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातारम’ या जयघोषांनी सभागृह दणाणून सोडले.

अधिवेशनात अभिनंदन ठराव

भारतीय वायुसेनेने मंगळवारी सकाळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला चढवला. या हल्यात सुमारे ३२५ दहशतवादी ठार झाले आहेत. भारतीय हवाई दलाने बजावलेल्या या कारवाईचे देशभरातून कौतुक केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी विधी मंडळाच्या विधान परिषदेतदेखील भारतीय जवानांचे कौतुक करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदनाचा ठराव ठेवला. या ठरावाला अनुमोदन देत विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे म्हणाले की, भारतीय जवानांनी फक्त दहशतवादी तळे उध्दवस्त केली नाहीत. तर सर्व भारतीय जवान सुखरुप परतले, ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी त्यांनी किती विमान वापरली, किती दारुगोळा वापरली या सगळ्याचा उहापोह न करता ही माहिती गुप्त ठेवायला हवी. तर ही तर फक्त झलक आहे, मुख्य सिनेमा तुम्हाला हवा तेव्हा रिलीज करा, असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

गाफिल राहून चालणार नाही

दरम्यान, यावेळी सर्व पक्षांच्या आमदारांकडून अभिनंदनाचा ठरावाला पाठींबा दर्शविला गेला. तर शेकापचे जयंत पाटील यांनी देखील या प्रस्तावाला पाठींबा दर्शविला. परंतु या हल्ल्यानंतर दहशतवादी शांत बसणार नाही. ते मुंबईला विशेष करुन सागरी मार्गालादेखील टार्गेट करु शकतात. मात्र गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे याची दखल आता पोलिसांनी घ्यायला हवी. असे मत त्यांनी यावेळी सभागृहात मांडले.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -