घरमुंबईभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पायाभरणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पायाभरणी

Subscribe

दादरच्या इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उद्या, १८ सप्टेंबर रोजी पायाभरणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पायाभरणी सोहळा पार पडणार आहे. उद्या, शुक्रवारी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आंबेडकर स्मारकातील आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्री उपस्थित राहणार असून यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यात येणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा हा राज्यातील पहिलाच सर्वात मोठा सोहळा असणार आहे. शिवाय लॉकडाऊन काळातीलही हा सर्वात मोठा कार्यक्रम असणार आहे.

कसे असणार बाबासाहेबांचे स्मारक

हे स्मारक ४५० फुटांचे, तर बाबासाहेबांचा पुतळा ३५० फुटांचा असणार आहे. यापूर्वी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. नव्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा १०० फूट आणि पुतळा ३५० फूट अशी स्मारकाची एकूण उंची आता जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार आहे. त्यामुळे पूर्वी ७०० कोटी रुपये होणारा खर्च आता १००० कोटी रुपयांवर जाणार आहे. आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता. आता सुधारित खर्च एक हजार ८९ कोटी ९५ लाख अपेक्षित असून, त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. स्मारकाचे काम शापूरजी पालनजी कंपनीमार्फत होणार आहे.

- Advertisement -

२०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते.

हेही वाचा –

Breaking: मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -