घरमुंबई'आपण दिवसरात्र महाराष्ट्रासाठी काम करता'... लतादीदींनी पत्राद्वारे केले BKC हॉस्पिटलच्या अधिष्ठात्याचे कौतुक

‘आपण दिवसरात्र महाराष्ट्रासाठी काम करता’… लतादीदींनी पत्राद्वारे केले BKC हॉस्पिटलच्या अधिष्ठात्याचे कौतुक

Subscribe

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून मुंबईतही दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा वाढता आकडा समोर येत आहे. वाढणाऱ्या कोरोनाबाधित रूग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. कोरोना रूग्णांना वाचवण्यासाठी ऑक्सिजनची भासणारी कमतरता यांमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची दिवसरात्र धडपड सुरू आहे. कोरोनाच्या जीवघेण्या परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रूग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्ससह इतर वैद्यकीय कर्मचारी अर्थात कोविड योद्ध्यांच्या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अशापरिस्थितीत भारतरत्न लता मंगेशकर यांनी मुंबईतील BKC हॉस्पिटलच्या अधिष्ठात्याचे कौतुक केले आहे. लता मंगेशकर यांनी BKC हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश डेरे यांना पत्र लिहून केले त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

असे केले लता दीदींनी पत्राद्वारे कौतुक

भारतरत्न लता मंगेशकर यांनी BKC हॉस्पिटलच्या अधिष्ठात्याचे कौतुक केल्याची माहिती BKC कोविड हॉस्पिटल आणि BMC ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करून दिली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांनी BKC हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश डेरे यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले की, ‘डॉ. श्री राजेश डेरे, सादर प्रणाम ! आपण महाराष्ट्रासाठी दिवसरात्र काम करत आहात, ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते. घरात सर्वांना नमस्कार!’

- Advertisement -

दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासात ३ हजार ५६ नवीन रुग्णांची भर पडली तर ३ हजार ८३८ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकूण ३० हजार ९४२ चाचण्या करण्यात आल्या असून सध्या ५० हजार ६०६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत ६९ मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत करोनाच्या विळख्यात सापडलेल्या १३ हजार ६१६ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता १३० दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा दर ०.५१ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहचलं आहे. गेल्या दिवसभरात ३ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख हजार ३८३ इतकी झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट ९० टक्के आहे.

२९ एप्रिल ते ५ मे पर्यंतचा मुंबईचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.५१ टक्के इतके आहे. झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या ९६ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर ५ पेक्षा अधिक रुग्ण सापडलेल्या ६४५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. यासह मुंबईत आज ३० हजार ९४२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील ३ हजार ५६ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -