घरमुंबईअर्णब गोस्वामी 'हा' विरोधकांचा लाडका पुत्र, भास्कर जाधव विरोधकांवर आक्रमक

अर्णब गोस्वामी ‘हा’ विरोधकांचा लाडका पुत्र, भास्कर जाधव विरोधकांवर आक्रमक

Subscribe

तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही - फडणवीस

अन्वय नाईक प्रकरणावरुन पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले होते. सध्या सुरु असलेल्या मनसुख मृत्यू प्रकरणात संशयास्पद भूमिका असलेल्या सचिन वाझेंना राज्य सरकार पाठीशी घालत आहे. सचिन वाझेंनीच मनसुख हिरेनची हत्या केली आहे त्यामुळे वाझेंना तात्काळ अटक करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सचिन वाझे यांनी अन्वय नाईक प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक केली होती. यामुळे विरोधक सचिन वाझेंना या प्रकरणातून बाजूला करण्याची मागणी करत असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. तसेच अर्णब गोस्वामी यांचा लाडका पुत्र आहे. म्हणून अर्णबला अटक केल्यामुळे भाजपचा जळफळाट होत असल्यामुळे सचिन वाझेंना तपासातून बाजूला करण्याचा भाजपचा डाव असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

भास्कर जाधव यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर देत म्हटले आहे की, २०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण दाबून टाकले. त्यामुळे ठाकरे सरकार आल्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. या पत्रात देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण दाबले असल्याचेही म्हटले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सचिन वाझे करत आहेत. म्हणून त्यांच्यावर आरोप करुन त्यांना तपासातून काढण्याची मागणी विरोधक करत आहेत.

- Advertisement -

सरकार सचिन वाझेंना काढणार नाही असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. तसेच केंद्रात सत्ता असल्यामुळे भाजपला असे वाटत आहे की, आमचे कोणी काही करु शकत नाही असे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. तसेच सचिन वाझे जर तपास अधिकारी तर विरोधकांचे बिंग फुटेल अशी भीती देवेंद्र फडणवीसांना आहे असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला आहे. अर्णब गोस्वामी यांचा लाडका पुत्र आहे. अर्णब गोस्वामीला अटक केल्यामुळे भाजपचा जळफळाट झाला असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही – फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना दिलेल्या प्रत्युत्तरात म्हटले आहे की, सचिन वाझे यांना कोणाच्या दबावाखाली वाचवण्याचं काम सुरु आहे. तसेच अन्वय नाईक प्रकरणात हायकोर्टाने काय निर्णय दिला आहे. हे भास्कर जाधव यांना माहित नाही. फडणवीसांनी गृहमंत्र्यांना सीडीआर बाबत माझी चौकशी करा असे खुले आव्हान केले आहे.

- Advertisement -

केस दाबल्याची चौकशी – गृहमंत्री

अन्वय नाईक प्रकरणाची तक्रार मुलगी आणि पत्नीने केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही तक्रार का दाबण्यात आली याची चौकशी करायची असल्याचे वक्तव्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -