घरताज्या घडामोडी...त्यावेळी भास्कर जाधव आणि फडणवीसांचही झालं होत निलंबन

…त्यावेळी भास्कर जाधव आणि फडणवीसांचही झालं होत निलंबन

Subscribe

पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या भाजपच्या १२ आमदारांना गैरवर्तणूक केल्याप्रकरणी १ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. यामुळे संतप्त झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यात चर्चा झाली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही, उलट वातावरण अधिकच तापले. त्यानंतर भाजपने सभात्याग केला. पण अशाप्रकारे आमदारांच निलंबन होण्याची ही पहीलीच घटना नाही. तर भाजपची सत्ता असतानाही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांनाही अशाचप्रकारे निलंबित करण्यात आलं होते.

२०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात गोंधळ घातला होता. त्यावेळी सभागृहाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत दोन्ही पक्षाच्या १९ आमदारांना २२ मार्च ते २०१७ पासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या इतर आमदारांबरोबर गुहागरचे भास्कर जाधव यांनाही निलंबित करण्यात आलं होतं. तर २०११ साली काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना तत्कालिन अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षातील देवेंद्र फडणवीस यांच्यासह नऊ सदस्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -